प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सलमान खान याची चौथीत असताना शाळेतून हकालपट्टी करण्यात आली होती. खुद्द सलमाननेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला. 'द तारा शर्मा शो' या कार्यक्रमात त्याने हजेरी लावली होती. आपल्या बालपणीच्या बर्याच गोष्टी सलमानने या मुलाखतीत सांगितल्या.
लहानपणी माझा सांभाळ करणं आई-वडिलांना खूप कठीण गेलं. आताही कठीण जातं. माझा स्वभाव सुधारण्याचा मी फार प्रयत्न करतोय, असं तो म्हणाला. यावेळी त्याने चौथीत असताना शाळेतून हकलण्यात आल्याचं सांगितलं. खरंतर मला माहित नाही की नेमकं माझं काय चुकलं, पण चौथीत असताना मला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. मला दुसर्या शाळेत दाखल करण्याचा सल्ला शिक्षकांनी दिला होता. मग मी आधी ज्या शाळेत होतो तिथे मला पुन्हा दाखल करण्यात आलं. तिथूनच मी माझं शिक्षण पूर्ण केलं, असं त्याने सांगितलं.
या कार्यक्रमात सलमानने त्याला पहिल्या जाहिरातीची ऑफर कशी मिळाली, याचा मजेशीर किस्सा सांगितला. दिग्दर्शकाच्या गर्लफ्रेंडला पटवण्याच्या प्रयत्नात करिअरमधली पहिली जाहिरात मिळाल्याचं त्याने सांगितलं. बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात सलमान खानच्या करिअरची सुरुवात कशी झाली हे फार क्वचित लोकांना माहित असेल. त्याला मिळालेल्या पहिल्या जाहिरातीचा भन्नाट किस्सा त्याने स्वत: नुकत्याच एका शोमध्ये सांगितला. 'द तारा शर्मा शो' या कार्यक्रमात त्याने हजेरी लावली होती.
दिग्दर्शक कैलाश सुरेंद्रनाथ यांनी सलमानला पहिल्या जाहिरातीची ऑफर दिली होती. नंतर त्याचं करिअर घडवण्यात कैलाश यांनी एका शिक्षकासारखी भूमिका बजावली. त्या जाहिरातीचा किस्सा सांगताना सलमान म्हणाला, सी रॉक क्लब येथे मी स्विमिंग करत होतो आणि तिथं लाल रंगाची साडी परिधान केलेली एक सुंदर तरुणी पूलच्या बाजूने जात होती. तिला पटवण्याच्या नादात मी पूलमध्ये पाण्याखाली गेलो आणि वेड्यासारखा अंडरवॉटर स्विमिंग करत होतो. जेव्हा पूलच्या दुसर्या बाजूला पोहोचलो आणि पाण्याच्या वर डोकं काढलं तेव्हा ती तिथे नव्हती. दुसर्याच दिवशी मला फार प्रॉडक्शन्समधून कॉल आला आणि त्यांनी कोल्ड ड्रिंकच्या जाहिरातीची ऑफर दिली. मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या काकीसोबत मी दिग्दर्शक कैलाश यांना भेटायला गेलो. त्यांना होकार कळवला आणि माझा नंबर कसा मिळाला हे विचारलं. ते म्हणाले की, ज्या मुलीला तू पटवण्याचा प्रयत्न करत होतास, ती माझी गर्लफ्रेंड आहे. तू खूप छान पोहतोस असं तिने मला सांगितलं. आम्ही जाहिरातीचे शुटिंग मालदिवमध्ये करणार आहोत आणि अंडरवॉटर स्विमिंग करता येईल असाच तरुण आम्हाला हवा होता. या जाहिरातीच्या माध्यमातून सलमान पहिल्यांदा कॅमेरासमोर गेला होता. सलमानचा 'दबंग ३' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षक-समीक्षकांकडून चित्रपटाला संमिर्श प्रतिक्रिया येत आहेत.
No comments:
Post a Comment