Monday, December 16, 2019

बोरे काढायला गेलेल्या दोन मुलांचा नदीत पडून मृत्यू


जत ,(प्रतिनिधी)-
शाळेला न जाता बोरे काढून पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जत तालुक्यातील सिंगनहळळी येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. श्याम शिवाजी हिप्परकर (वय 10) व अतुल पोपट हिप्परकर (वय 9) अशी मयत मुलांची नावे आहेत.

जत तालुक्यातील सिंगनहळळी खालील तळेवाडी प्राथमिक शाळेत ही मुले शिकत होती. या दोन्ही मुलांचे आई वडील शेतात मजूरी करत आहेत. तळेवाडी वस्ती येथे ते शिकत होते. याच शाळेतील चार मुले शाळेला न जाता बोरे काढण्यासाठी गेली. त्यानंतर पोहायला जायचे ठरले. जवळच असलेल्या कोरडा नदी पात्रात ते पोहायला गेले. या कोरडा नदी पात्रातून वाळूचा बेकायदा उपसा होत असल्याने मोठ-मोठी डबकी पडली आहेत. या डबक्यात ते पोहायला गेले. पहिल्यांदा अतुल हा उडी मारला मात्र डबके खोल असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे श्याम हा त्यास वाचविण्यासाठी पाण्यात बुडी मारला. दोघांनीहि एकमेकांना पाण्यात मिठी मारल्याने पाण्यात बुडून मयत झाले. इतर दोघे बाजूस होते ते घरी जाऊन नातेवाईकांना सांगितल्या नंतर हा प्रकार कळाला. दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सिंगनहळळी गावावर शोककळा पसरली आहे.  श्याम हा इयत्ता चौथीत शिकत होता तर अतुल हा तिसरीत शिकत होता.याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात पोलिस पाटील भगवान खंडू हिप्परकर यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार कणसे करत आहेत.

No comments:

Post a Comment