डिसेंबर २५, इ.स. १६४२ रोजी इंग्लंडमधील लिंकनशायर काउंटीच्या वूलस्थॉर्प या गावात जन्मले. आयझ्ॉक न्यूटनचे वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे आयझ्ॉक त्याच्या आजीजवळ राहिले.
वयाच्या १२ वर्षांपर्यंत आयझ्ॉक जेमतेम दोन वर्षे शाळेत होते. त्यांना गणिताची आवड उत्पन्न होऊ लागली होती. तेवढय़ात त्यांचे सावत्र वडील स्मिथ वारले. आपल्या नव्या बाळाला घेऊन आयझ्ॉकची आई हाना लिंकनशायरला परत आली. तिने आयझ्ॉकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले. एक दिवस दुपारी आयझ्ॉक दमूनभागून झाडाच्या सावलीत बसले होते. मंद वारा वाहत होता.
आयझ्ॉकची तीक्ष्ण बुद्धी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आयझ्ॉकना वाटले, आपण वार्याचा वेग मोजावा. त्यांच्याजवळ वेग मोजायला काही साधन नव्हते. आयझ्ॉकने एकदा वार्याच्या दिशेने उडी मारली. जिथे उडी पडली तिथे एक दगड ठेवला. मग जरा वेळाने वार्याच्या उलट दिशेने उडी मारली व त्या उडीच्या जागी दगड ठेवला. या दोन दगडांतील अंतर एका दोरीच्या साह्याने आयझ्ॉक मोजत असताना त्यांचे मामा, विल्यम आयस्कॉफ शेतावर आले. विल्यम आयस्कॉफ केंब्रिजमध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते. त्यांनी विचारले, हे तू काय करतोस? आयझ्ॉक म्हणाले, मी वार्याचा वेग मोजतो आहे. या उत्तराने मामा अवाक झाले. त्यांना आयझ्ॉकची तीव्र असामान्य बुद्धी कळली. घरी जाऊन त्यांनी हानाला आयझ्ॉकला शाळेत घालायला सांगितले. १६६१ मध्ये आयझ्ॉक ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांचा गुरुत्वाकर्षणाचा शोध सर्वांनाच माहीत आहे. १६६८ मध्ये त्यांनी ६ इंच लांब व एक इंच रुंद असलेली दुर्बीण तयार केली. आजही लंडन म्युझियममध्ये ही दुर्बीण आहे. त्यांनी वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडून केप्लरचे नियम सिद्ध केले.
गतिकीमध्ये तीन गतीचे नियम मांडले. त्यांनी परावर्ती दुर्बीण बनवली, व प्रकाशाचे मूलभूत रंगात विघटन करून दाखविले.
गणितामध्ये त्यांनी ग्यॉटफ्रीड लिब्नित्झ याच्याबरोबर कलन ही गणितशाखा विकसित केली.
No comments:
Post a Comment