बॉलिवूडसाठी २0१९ हे वर्ष फार विशेष होतं. या वर्षी अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. काही सिनेमांनी चांगली कमाई केली तर ज्या सिनेमांकडून अपेक्षा होत्या त्यातील काही बॉक्स ऑफिसवर दणदणीत आपटले. दरम्यान, गूगल इंडियाने १0 सिनेमांची यादी शेअर केली आहे. यात सर्वाधिक सर्च केले गेलेले सिनेमे कोणते ते सांगितले आहेत. कबीर सिंग- या यादीत पहिलं नाव आहे ते शाहिद कपूरच्या कबीर सिंग सिनेमाचं. तेलुगू सिनेमा अर्जुन रेड्डीचा हा अधिकृत रिमेक होता. सिनेमाचं संगीत, संवाद याने तरुणाईला अक्षरश: वेड लावलं. असं असलं तरी अनेकांनी या सिनेमाचा विरोधही केला. कबीर सिंग शाहिदच्या करिअरमधला सर्वात हिट सिनेमा ठरला.
अव्हेंर्जस एण्डगेम- या यादीत दुसरं नाव आहे ते अव्हेंर्जस एण्डगेम या सिनेमाचं. थॉर, आयर्नमॅन आणि हल्कसारख्या सुपरहिरोंचा भडीमार असणार्या या सिनेमाला भारतीय प्रेक्षकांकडूनही तेवढंच प्रेम मिळालं. भारतात या सिनेमाने तब्बल ३७३.२२ कोटी रुपयांची कमाई केली. तसेच जगभरात सर्वात जास्त कमाई करणार्या सिनेमांमध्ये हा सिनेमा अग्रणी ठरला.
जोकर- जोकिन फिनिक्स स्टारर जोकर सिनेमा सर्वात जास्त पाहिला गेलेला आर- रेटेड सिनेमा होता. टॉड फिलिप्स दिग्दर्शित हा सिनेमा पाहण्यासाठी अनेकांनी तिकीट बारीवर लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. बॉलिवूडमध्ये जोकरने हसवण्याचं काम केलं तर हॉलिवूडच्या जॉकरचा अंदाज थोडा वेगळा होता.
कॅप्टन मार्वेल- या यादीत चौथ्या स्थानावर कॅप्टन मार्वेल सिनेमा आहे. या सिनेमात ब्री लार्सनने कॅप्टन मार्वलची भूमिका साकारली होती. भारतात या सिनेमाने एकूण ८४.३६ कोटी रुपयांची कमाई केली होती.
सुपर ३0- हे वर्ष हृतिक रोशनसाठी फार खास होतं. आनंद कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाला लोकांनी इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च केले गेले.
मिशन मंगल- गूगल सर्च लिस्टमध्ये सहाव्या स्थानावर अक्षय कुमार स्टारर 'मिशल मंगल' सिनेमा आहे. अक्षयसह विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, किर्ती कुल्हारी, नित्या मेनन आणि शर्मन जोशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका यात होत्या.
गली बॉय- धारावीमधील एक मुलगा रॅपर होण्याची स्वप्न पाहतो आणि अथक मेहनतीने तो रॅपर होतो अशी गली बॉयची कथा होती. झोया अख्तर दिग्दर्शित या सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका होत्या. विशेष म्हणजे सिनेमाला ९२ व्या ऑस्कर अकादमी पुरस्कारासाठीही नामांकन मिळालं आहे.
वॉर- बॉलिवूडमधले सर्वात महागडे अक्शन स्टार जर एकाच सिनेमात दिसले तर.. वॉर सिनेमाच्या बाबतीतही तसंच काहीसं झालं. इंटरनेटवर या सिनेमाबद्दल सर्वाधिक सर्च केले गेले.
हाउसफुल ४- वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झालेला हा सिनेमा हिट सिनेमांच्या यादीत बसत नसला तरी इंटरनेटवर याबद्दल सर्वात जास्त सर्च करण्यात आले. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल या सिनेमाला यशस्वी करू शकले नाहीत.
उरी: द सर्जिकल स्टाइक- विकी कौशलला या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. भारतीय सेनेचं शौर्य आणि खर्या घटनेवर हा सिनेमा बेतलेला होता. गूगल सर्च लिस्टमध्ये हा सिनेमा १0 व्या स्थानावर आहे.
No comments:
Post a Comment