Thursday, December 19, 2019

शाळेतील छडी झाली गूल.!

जत,(प्रतिनिधी)-
शिक्षणाप्रमाणे शिक्षकांच्या संकल्पनेतही बदलत होऊन शाळेतील छडी हद्दपार झाल्याचे चित्र असून, हातावर छड्या मारणे, डस्टर फेकून मारणे, पायाचे अंगठे धरून तर बेंचवर हात वर करून उभे करणे, शाळेच्या मैदानाला धावत फेर्‍या मारायला लावणे, अशा विविध शिक्षा जवळजवळ संपल्या आहेत. या शिक्षेमुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांना शारीरिक इजा होण्याचे प्रकार घडत असतात. त्यातून मोठे वादही झाले आहेत. मात्र, आता अशा शारीरिक शिक्षेचे स्वरूप शाळांनी बदलले आहे.

तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पुर्वी विद्यार्थ्यांना शिक्षा करताना शिक्षकांकडून बहुतेक वेळा छडीचा वापर केला जात होता. घरचा अभ्यास केला नाही. तर घे हातावर छड्या, असे म्हणणारे मास्तर हा हमखास प्रत्येक शाळेत असत. मात्र, आता अशा छडी घेऊन फिरणार्‍या मस्तरांची संख्या नगण्य झाली आहे. विद्यार्थ्यांना शारीरिक इजा होईल, अशी शिक्षा केली जात नाही. त्याऐवजी दिलेला गृहपाठ पुन्हा लिहावा, पीटीच्या तासाला वर्गात बसून अभ्यास करायला लावणे, पालकांना पत्र देऊन मुलांची माहिती देणे, अशा मार्गांचा अवलंब अनेक शाळांकडून होत आहे.
शासनानेही विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्यास मनाई केली आहे. शिक्षकांच्या मारहाणीत शारीरिक संबंधातील अशा कुठल्याही प्रकारची शिक्षा करण्यास कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. अनेकदा तर शारीरिक शिक्षा देणार्‍या शिक्षकांना दंड दिल्याच्या घटना ही काही वर्षापूर्वी घडल्या आहेत. मुलांना शिक्षकांनी शिक्षा करणे यात गैर काहीही नाही. ही विद्यार्थ्यांच्या जडण-घडणातील तो महत्त्वाचा भाग आहे.परंतु, शाळेत होणार्‍या शिक्षेमुळे मुलांना गंभीर इजा होईल, अशा पद्धतीने मारहाण करणे अथवा मैदानात पायबंद लावणे हे चुकीचे आहे. पूर्वी अशा शिक्षा होत्या. परंतु, आता शाळाही याबाबत खबरदारी घेताना दिसून येतात. याबाबत पूर्वीही अनेक प्रकरणे झालेली असून, पालकांनीही या विरोधात आवाज उठवलेला आहे.

No comments:

Post a Comment