Thursday, December 12, 2019

राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेस पुरस्कार


जत,(प्रतिनिधी)-
 राजे रामराव महाविद्यालय, जत ला शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शै. वर्ष २०१८-१९ साठी उत्कृष्ठ महाविद्यालय व डाॅ. राजेंद्र लवटे यांना उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी म्हणून सांगली जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती प्र. प्राचार्य डॉ. विठ्ठल ढेकळे यांनी दिली.

राजे रामराव महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने मागील चार वर्षात नियमीत व शिबिरात राबवलेल्या विविध उपक्रमांची तसेच महाविद्यालय परिसरात तयार करण्यात आलेला  पाझर तलाव व दिड हजार वृक्षांची लागवड व त्यांचे ठिबक सिंचनाद्वारे केलेले संवर्धन यांची दखल घेऊन सदर पुरस्कार मा. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे हस्ते शनिवार दि. ७ डिसेंबर, २०१९ रोजी प्रदान करण्यात आला. महाविद्यालयातील पाझर तलाव व वृक्ष लागवडीचा पथदर्शी  प्रकल्प जत मधील जनतेने पाहून त्याचे अवलोकन करावे असे आवाहन डाॅ. विठ्ठल ढेकळे यांनी केले.
सदर पुरस्कारासाठी डाॅ. डि.के. गायकवाड, प्रा. सदाशिव मोरे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी प्रा. कृष्णा रानगर, डाॅ. भिमाशंकर डहाळके, सर्व गुरूदेव कार्यकर्ते, प्रशासकीय कर्मचारी, स्वयंसेवक यांनी कष्ट घेतले.

No comments:

Post a Comment