Monday, August 19, 2019

रांगोळीचे महत्त्व


सुमारे एक हजार वर्षांपूर्वी वात्सायनाने लिहिलेल्या 'कामसूत्रया ग्रंथामध्ये स्त्रियांना अवगत असाव्यात अशा चौसष्ट कलांमध्ये 'रंगोलीया कलेचा समावेश होतो. रांगोळी म्हणजे रंगांच्या साहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला फार महत्त्व आहे. रांगोळीचा उल्लेख रामायणमहाभारत तसेच वेदांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो. भारतासहित अनेक देशांमध्ये या कलेचा प्रसार झालेला आहे. हिंदू धर्मात दैनंदिन कार्यात रांगोळीचे महत्त्व तर आहेचपण धार्मिक कार्य व सण यामध्ये तिचे असाधारण असे महत्त्व आहे. प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. देवघरअंगणउंबरठा तसेच तुळशीजवळ रांगोळी काढली जाते. साधारणत: रंगोलीमध्ये स्वस्तिकगोपद्मशंखचक्रगदाकमळाचे फूलबिल्वपत्रलक्ष्मीची पावलेसूर्य देवेतेचे प्रतीकश्रीकासवआदी मांगल्यसूचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात.

पूर्वी सकाळी सडासंमार्जन केल्यावर अंगणात रांगोळी काढली जायची. सध्याच्या काळात शहरांमध्ये गेरूच्या साहाय्याने अगोदर अंगण रंगवून किंवा फरशी किंवा टाईल्स बसवली असेलतर त्यावर बाजारात मिळणार्‍या छापे किंवा कोन यांच्या साहाय्याने रांगोळ्य़ा काढल्या जातात. रांगोळी हे शुभचिन्ह म्हणून भारतीय संस्कृतीचे आणि संस्कारांचे प्रतीक आहे. भारतात घरातील देवघरापुढे किंवा अंगणात छोटीशी का होईनारांगोळी रोज काढतात. ठिपक्यांच्यागाठीच्यावेलबुट्टीच्यास्वस्तिकज्ञानकमळ अशा शुभचिन्हांच्या आणि अगदी अलीकडील काळातील'संस्कारभारती'च्या मुक्तशैलीच्याअसे रांगोळ्यांचे काही प्रकार प्रचलित आहेत. शुभमंगलकारक शक्तींचे स्वागत करण्यासाठी घराच्या उंबरठय़ावरघरासमोरील अंगणातदेवघरात आणि तुळशीवृंदावनासमोर रांगोळी काढून लक्ष्मीचे-शुभ शक्तीचेमांगल्याचे-स्वागत करण्याची प्रथा भारतात पुरातन काळापासून चालत आली आहे. घरे बैठी व पुढेमागे मोकळी जागा असणारी होतीतेव्हा घरातील स्त्रिया भल्या पहाटे घरासमोरील अंगण झाडूनशेणसडा टाकून त्यावर शुभ्र रांगोळी काढत असत. रांगोळी घालणार्‍या स्त्रीचे वर्णन कवी केशवसुत यांनी त्यांच्या सव्वाशे वर्षांपूर्वीच्या 'रांगोळी घालताना पाहूनया कवितेत केले आहे. केशवसूत म्हणतात,
होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर।
बालार्के आपली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर।।
रांगोळी हा स्त्रियांचा जिव्हाळ्य़ाचा विषय. ती तिच्या मनातील प्रेमभाववात्सल्यममता रांगोळीचे ठिपके जोडूनसुंदर नक्षी रेखून आणि विविध रंग भरूनसाध्यासुध्या रांगोळीचा गालीचा विणते आणि तिच्याच कलाकृतीकडे पाहून आनंदून जातेसमाधान पावते. दारासमोरदेवघरात आणि तुळशीवृंदावनापुढे रेखलेली समाधानाची रांगोळी पाहून लक्ष्मीदेवता प्रसन्नतेने आणि आनंदाने त्या घरात प्रवेश करते ही त्यामागची भावना. रांगोळीसुद्धा लोकपरंपरेतून जन्माला आली. रांगोळी काढणे ही एक कला आहे आणि तिचा उगम धर्माच्या अनुबंधानेच झाला आहे. माणसे रांगोळी केव्हापासून काढू लागली व रांगोळीची पहिली रेघ कोणी ओढलीहे निश्‍चित सांगणे कठीण आहे. त्याबाबतीत एवढेच म्हणता येईल कीरांगोळी ही मूर्तिकला आणि चित्रकला यांच्याही आधीची आहे. कोणत्याही धार्मिक किंवा मांगलिक कृत्यात रांगोळी आवश्यक आणि प्राथमिक गोष्ट आहे. 
पूर्वी स्त्रियांमध्ये आकर्षक रांगोळी काढण्याचे कौशल्य असायचे. मात्रआधुनिक काळात स्त्रियांचे ज्ञान वृद्धिंगत झाले असलेतरी रांगोळी काढायच्या बाबतीत मात्र पीछेहाट झाली आहे. या महिला रांगोळी काढण्यासाठी रांगोळी स्टिकर्सविविध नक्षीदार रांगोळीच्या जाळ्यारोलरपावले यांचा वापर करू लागल्या आहेत. 


No comments:

Post a Comment