Wednesday, August 14, 2019

सीबीएसई बोर्डाने एससी, एसटी प्रवर्गासाठी फी वाढ केल्याप्रकरणी जत 'बसपा'वतीने निषेध

जत,(प्रतिनिधी)-
तुघलकाबाद (दिल्ली) येथील ७०० वर्षे पुरातन संत शिरोमणी रोहिदास महाराज मंदिर पाडल्याप्रकरणी व CBSE बोर्डाने SC व ST या प्रवर्गातील १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांची मनमानी रितीने २४ पटीने फी वाढ केल्याच्या निषेधार्थ बसपा जत विधानसभाच्या वतीने  तहसिलदार  यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात संत शिरोमणी रोहिदास महाराज मंदीर नव्याने बांधण्यात यावे व CBSE बोर्डाची वाढीव फी रद्द करण्यात यावी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी विधानसभा अध्यक्ष तानाजी व्हनखंडे, संत गुरू रविदास समता परिषद चे तालुकाध्यक्ष किरण शिंदे,  शहराध्यक्ष सुनिल क्यातन, विधानसभा प्रभारी जकाप्पा सर्जे, विधानसभा प्रभारी महादेव कांबळे, विधानसभा महासचिव शरद शिवशरण, विधानसभा प्रभारी संतोष व्हनकट्टे, शहर महासचिव दिपक कांबळे, जयवंत शिवशरण, कुंडलिक शिवशरण, ज्ञानेश्वर हुवाळे, ज्ञानेश्वर शिवशरण, सुभाष शिवशरण, गौतम सर्जे, सदाशिव कांबळे इ. बहुजन समाज पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळ-
(दिल्ली येथील संत रोहिदास महाराज यांचे मंदिर पाडल्याप्रकरणी तसेच एसी,एसटी प्रवर्गासाठी शैक्षणिक फी वाढ केल्याप्रकरणी जत 'बसपा' शाखेच्यावतीने निषेध करण्यात आला

No comments:

Post a Comment