Saturday, August 17, 2019

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता

जत,(प्रतिनिधी)-
आगामी राज्य विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीसाठी पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. शासन आणि निवडणूक आयोगाने तशी पूर्ण तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सांगली आणि कोल्हापूरला महापुराचा फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुका लांबणीवर पडण्याची चर्चा सुरू होती, मात्र  तसे काही होणार नसून पुढील महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रमजाहीर होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण करत असून पुन्हा एकदा त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लपविण्यासाठी सताधारी भाजपची  यंत्रणा कामाला लागली आहे.
महाजनादेश यात्रेद्वारे संपूर्ण राज्यभर  मुख्यमंत्री फडणवीस हे फिरून  कार्यकर्ते आणि पदाधिकान्यांशीसंवाद साधण्याचे नियोजन सत्ताधारी भाजपकडून करण्यात आले आहे. याकरिता गेल्या पाच वर्षातील कामाचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र सांगली आणि कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने महापुराचा फटका या दोन जिल्ह्यांना बसला. येथील अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत, तर सुमारे २० हुन अधिकजणांचा जीव येथे गेला आहे. सध्या येथील पूर्व परिस्थिती नियंत्रणात येत असून शासनासह विविध संस्था, सामाजिक संघटना पूरग्रस्तांना मदत करत आहेत, त्यामुळे लवकरच या दोन्ही जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वपदावर येण्याची आशा शासनाला आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा महाजनादेश यात्रेला सुरुवात करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुढील
महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करून आचारसंहिता लागू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सप्टेंबरमध्ये दुसन्या अथवा तिसऱ्या आठवड्यात राज्य विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये
मतदानाची प्रक्रिया पार पाडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने राज्यशासन आणि निवडणूक आयोगाची स्वतंत्र यंत्रणा कामाला लागली आहे. त्याचबरोबर
पुन्हा एकदा महाजनादेश यात्रेला सुरुवात होणार आहे.
सोलापुरातही यात्रा येणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः उपस्थित राहून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेशी संवाद साधणार आहेत. यंदाही कसल्याही परिस्थितीत राज्यात भाजपची सत्ता आणायची, असे नियोजन सध्या सुरु आहे. पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आहेत. त्याचबरोबर भाजपच्या मंत्र्यांना आणि आमदार व खासदारांना आपापल्या मतदारसंघात संपर्क वाढवण्याबरोबरच जनतेची कामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment