Wednesday, August 7, 2019

जिल्ह्यात 67 हजारहून अधिक व्यक्ती, 21 हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत  सुमारे 13 हजार 259 कुटुंबांतील 67 हजार 503 लोक व 21 हजार 110 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मिरज तालुक्यातील 19 गावांतील 3 हजार 639 कुटुंबांतील 19 हजार 697 लोक व 5 हजार 580 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 22 गावांतील 4 हजार 114 कुटुंबांतील 19 हजार 204 लोक व 5 हजार 510 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 30 गावांतील 4 हजार 307 कुटुंबांतील 19 हजार 532 लोक व 7 हजार 279 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 17 गावांतील 292 कुटुंबांतील 1 हजार 318 लोक व 2 हजार 298 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील 907 कुटुंबांतील 7 हजार 752 लोक व 443 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.
मिरज तालुक्यातील बामणी, जुनी धामणी, अंकली, हरिपूर, मौजे डिग्रज, वाळवा तालुक्यातील शिरगाव, भरतवाडी, पलूस तालुक्यातील भिलवडी, तावदरवाडी, सुखवाडी, राडेवाडी, सूर्यगाव, तुपारी, बुर्ली, नागराळे, दह्यारी, घोगाव, पुणदी तर्फे वाळवा या गावांचा संपर्क तुटला असून स्थलांतरण सुरू आहे.

No comments:

Post a Comment