Friday, August 2, 2019

माध्यमिक शिक्षक संघाचे ( फेडरेशन ) 9 ऑगस्ट रोजी संघर्षधरणा आंदोलन


जत,(प्रतिनिधी)-
राज्य शासनाचे शैक्षणिक धोरणाविषयीचे नियम हे माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेवर
अन्याय करणारे आहेत. राज्यातील शिक्षकांचे वेतन ,वेतनवाढ, विविध भत्ते , केंद्राप्रमाणे मिळावे व 4 जुलैची अधिसूचना रद्द करण्यात यावी. यासाठी माध्यमिक तसेच शासनाच्या प्रास्तविक खाजगी शाळांतील कर्मचारी सेवाशर्ती अधिनियम 1977 मध्ये मसुदा बदलास तीव्र विरोध दर्शवण्यासाठी व या  धोरणाचा निषेध करण्यासाठी शुक्रवार दि. 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी सकाळी 11 ते  दुपारी 2  या कालावधीत सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) च्या आदेशानुसार सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन ) संघर्ष धरणा आंदोलन करण्यात  आहे.

याबरोबरच अन्य प्रमुख्या मागण्याही मांडण्यात येणार आहे.  राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम 1977 व नियमावली 1981 मधील नियम 7 पोटनियम (i)व (ii) ऐवजी दि.04/07/22019 रोजी प्रकाशित महाराष्ट्र राजपत्र असाधारण भाग-4 ब अन्वये
मसुदा (1), 2 ( एक व दोन ) नुसारबदल केलेला आहे. सदर बदलास तीव्र  हरकत आहे.कारण यामुळे यापुढे राज्यातील खाजगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तरांना केंद्राप्रमाणे मिळणाच्या वेतन व विविध भत्ते यातील वेळोवेळी प्रदेय होणा-या वैधानिक अधिकार / लाभ याऐवजी “शासन वेळोवेळी ठरवून देईल त्याप्रमाणे असतील”... या दुरूस्तीने वेतन संरक्षण कायम राहणार नाही. अशी आमची धारणा आहे. म्हणून केंद्राप्रमाणे वेतन व विविध भत्ते यातील
सुधारीत विद्यमान लाभ कायम ठेवणेत यावेत. यासाठी उपरोक्त मसुदा रदद करणेत यावा. तसेच  उपरोक्त नियमावली 1981 मधील “अनुसुची” क “वेतनश्रेणी” हा सुधारीत वेतनश्रेणीचा वैधानिक आधार असल्याने “वगळण्याचा निर्णय रदद करणेत यावा. त्याऐवजी “अनुसची” क मध्ये ( बक्षी कमिटी शिफारशी ) 7 व्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणी” चा समावेश करावा व या वेतनश्रेणी राज्यातील खाजगी अनुदानित , विनाअनुदानित व कायम अनुदानित , स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील शिक्षक / शिक्षकेत्तर यांच्या सर्व संवर्गास लागू होतील. अशी तळटिप देणेत यावी.
या सर्व मागण्याकरीता सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन)संघर्ष धरणा आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष हाजीसाहेब मौला मुजावर हे करणार आहेत. राज्यातील शिक्षकांच्या वेतनातील तरतुदीत बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या बदलानुसार शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना केंद्र सरकारने वेतन ठरवून दिल्याप्रमाणे न राहता त्यात बदल करण्याचा अधिकार राज्य शासनास राहणार आहे असे नमुद केले आहे. या कायद्यामुळे शिक्षकांच्या वेतन वाढीबाबत अनिश्चितता येणार असल्याने सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ या अन्यायकारक अधिसुचने विरोधात तीव्र आंदोलन करणार आहे.
असे सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हाजीसाहेब मुजावर यांनी पत्रकार परिषदेत सांगतले. यावेळी सचिव बळीराम कसबे , उपाध्यक्ष वैभव माने व अरविंद मेनगुदले, कोषाध्यक्ष प्रकाश वाघमोडे , सहसचिव बायाक्का पाटील ,सल्लागार अजितकुमार होवाळे, एन डी कांबळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment