जत,(प्रतिनिधी)-
जिल्ह्यातील महापूर वतालुक्यातील दुष्काळ याची भान राखत उमदीतील ग्रामस्थ एक गावएक गणपती संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. उमदी पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजित केलेल्या 'एक गांव एक गणपती' संकल्पना व शांतता बैठकीत उमदी शहरात एकच गणपती बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. उमदी येथे सुमारे 15 हून अधिक गणेश मंडळ आहेत उमदीतील सर्वच गणेश मंडळाने स्वतः लेखी संमती देऊन एकच गणपती बसविण्यास पाठींबा दर्शविला.
प्रास्ताविक तालुका पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी केले.उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कोळेकर यांनी मार्गदर्शन करून नियम अटी सांगून उमदीतील ग्रामस्थ 'एक गाव एक गणपती'चा निर्णय घेऊन आदर्श निर्माण केला आहे असे सांगितले
यावेळी एकच गणपती उमदी पोलीस ठाण्याच्या ग्राउंडच्या मंडपात स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरपंच निवृत्ती शिंदे व राष्ट्रवादीचे नेते मानसिद्ध पुजारी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी भाजपचे युवा नेते राजकुमार चव्हाण , बंडा शेवाळे, दावल शेख, संतोष अरकेरी, राहुल संकपाळ, मनोहर शिंदे, अफलू पाटील, संगू ममदापुरे, मुकुंद स्वामी, अशोक नागणे, अरविंद मुंगळे, संजू नाव्ही, गुणवंत हिरेमठ, यलाप्पा तोरणे, रवी ऐवळे, गिलकी (केरूर) सचिन हिरेमठ, योगेश वागदारी आदी मोठ्या संख्येने गणेश मंडळाचे पदाधिकारी , कार्येकर्ते उपस्थित होते. पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल वळसंग यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment