जत,(प्रतिनिधी)-
शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला करा, असा शासनाचा आदेश आहे. मात्र, तरीसुद्धा शिक्षकांचे पगार कधीच वेळेत होत नाही. माहे जुलैचा पगार अद्यापही न मिळाल्यामुळे शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पगारास विलंब करणार्या अधिकार्यांवर कारवाईची मागणीही होत आहे.
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे वेतन महिन्याच्या एक तारखेला करण्याच्या स्पष्ट सूचना शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिल्या आहेत. मात्र, तरीसुद्धा शिक्षकांचे वेतन नियमितपणे १ तारखेला होत नसल्याबाबत शिक्षकांचे लोकप्रतिनिधी व संघटनांकडून शासनास तक्रारी प्राप्त होत असल्यामुळे कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी २ ऑगस्ट २0१९ रोजी पुन्हा एक पत्र काढून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतन १ तारखेस करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान काल १२ ऑगस्ट २0१९ ला मुस्लिम बांधवाच्या पवित्र 'बकरी ईद'असल्यामुळे माहे जुलै २0१९ चे वेतन ५ ऑगस्टपर्यँय करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. परंतु, जिल्ह्यातील शिक्षकांचे अजूनही माहे जुलैचे वेतन अदा झाले नाही. सध्याचे दिवस सॅन उत्सवाचे आहेत. त्यामुळे पैशाची आवश्यकता असते. पण पगारच झाल्याने सॅन उत्सव कसे साजरे करणार असा सवाल उपस्थित होत आहे. शासनाचा आदेश असूनही शिक्षकांचे पगार वेळेवर होत नसेल तर ही आदेशाची पायमल्लीच आहे. त्यामुळे शिक्षकांच्या वेतनास दरमहा होणार्या विलंबास जबाबदार यंत्रणा /अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
No comments:
Post a Comment