जत,(प्रतिनिधी) -
गतवर्षीच्या माध्यमिक शालान्त (10 वी) परीक्षेच्या निकालाची टक्केवारी घसरल्याने सर्वच स्तरावर चिंतेचे वातावरण पसरले आहे. शाळांची निकालाची टक्केवारी घसरल्याने त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पालकांमध्ये,विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून आली. हा निकालाचा टक्का घसरण्यामागे शाळांतर्गत गुण कमी केल्याचे कारण आहे. त्यामुळे ही गुणपद्धती पुन्हा सुरूहोणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे भाषा आणि सामाजिक शाखे विषयांची रद्द केलेली तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा पुन्हा सुरू करण्याची शिफारस तज्ज्ञांच्या समितीने केली आहे. एसएससी बोडच्या अंतर्गत मूल्यमापन व विषय रचनेवर पुर्नविचार करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २९ सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने याविषयीचा अहवाल शिक्षण विभागाकडे सोपविला असून या आठवड्यात दहावीच्या मूल्यमापन पद्धतीवर निर्णय होण्याची शक्यता आहे.
दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याबरोबरच यंदा
मूल्यमापनपद्धतही बदलली. विद्याथ्यांची खरी गुणवत्ता समोर यावी यासाठी तोंडी परीक्षा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. या निर्णयामुळे दहावीचा निकालही तब्बल १२ टक्क्यांनी घसरला. कमी टक्केवारी एसएससी बोडचे विद्यार्थी इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावी प्रवेशात मागे पडले. यामुळे राज्य सरकारविरोधात विद्यार्थी-पालकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. तोंडी परीक्षा घ्यायच्या की नाहीत यावर निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाने तज्ञांची समिती नेमली होती.
तसेच याविषयावर शिक्षण क्षेत्रातील निगडीत इतर लोकांच्या ऑनलाईन शिफारशीही मागविल्या होत्या.लेखी परीक्षेत ८० पैकी १६ गुण अनिवार्य२९ सदस्यीय समितीने अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुणदेण्याची शिफारस केली आहे. तसेच ८० गुणांच्या लेखी परीक्षेत उत्तीर्णतेसाठी १६ गुण मिळविणे अनिवार्य करण्याची शिफारसही या समितीतील तज्ज्ञांनी केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा होणार की नाही, यावर याच आठवड्यात निर्णय होणे अपेक्षित आहे. समितीत पाठ्यपुस्तके निर्मितीतील सदस्य नाही
तोंडी परीक्षेसंदर्भात अहवाल तयार करणा-या समितीत
दहावीची नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके तयार
करणा-यांपैकी एकही सदस्य नव्हता. पाठ्यपुस्तक
निर्मितीतील सदस्यांनी सांगितले की, 'पाठ्यपुस्तके तयार करताना आम्ही अंतर्गत मूल्यमापनाचा विचार केला नव्हता, भाषा विषयाचा पेपरपॅटर्न तयार करताना नववीतील व्याकरणाला २० गुण आणि विद्यार्थ्यांच्या लेखनशैलीला २० गुण दिले आहेत. पण तोंडी परीक्षा घेतल्यास हे गुण आम्हाला कमी करावे लागणार आहेत. विद्याथ्यांची परीक्षेची तयारी लक्षात घेता तोंडी परीक्षा घेण्याविषयीचा निर्णय शिक्षण तिने लतकात लता जाहीर को आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment