जत,( प्रतिनिधी)-
शासन भरतीपूर्वी सांगली जिल्ह्यात केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांची पदोन्नती करण्यात यावी तसेच स्वयंपाकी मानधन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेमार्फत शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद तम्मण्णागौडा रवि-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी संघटनेच्या वतीने शिक्षण सभापती रवि-पाटील यांचा जिल्हा परिषद स्वीय निधीतून इयत्ता चौथी व इयत्ता सातवीची सन 2018-19 मध्ये डॉ. पंतगराव गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षेसाठी तयारी व्हावी करिता उपक्रम राबविल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषद शाळांमध्ये बऱ्याच वर्षांपासून वरिष्ठ मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.त्यामुळे शिक्षकांमधून वरिष्ठ मुख्याध्यापक व विषय शिक्षक पदोन्नतीने ही पदे तात्काळ भरण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
त्याचबरोबर दुष्काळी टंचाईग्रस्त तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन अंतर्गत आठवड्यातून तीन वेळा पौष्टिक आहार खाऊ बचत गटामार्फत दिला जातो. हा शाळांचा खाऊ खर्च खूप असून शालेय पोषण आहार स्वयंपाकी यांना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे पौष्टिक आहाराचे व स्वयंपाकी बील तात्काळ मिळावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष-संतोष काटे,शिक्षक नेते पी.एस.ऐवळे, विषयतज्ञ सदाशिव ऐवळे उपस्थित होते.
फोटो ओळ-( सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती यांना केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक पदोन्नती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आले.)
No comments:
Post a Comment