Monday, August 19, 2019

संत निरंकारी मंडळाच्यावतीने मुक्ती पर्व दिवस साजरा


जत,(प्रतिनिधी)-
 मानवाचा जन्म कशासाठीआणि  जन्माचे अंतिम उद्दिष्ट काय आहे ते प्राप्त करण्यासाठी  सदगुरुचे महत्व मानवास समजावण्याचे महान कार्य अनेक संतांनी  केले. त्यांच्या जिवन कार्याचे स्मरण करून प्रेरणा घेण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मंडळ १५ आँगस्ट हा दिवस मुक्तीपर्व दिवस म्हणून साजरा करतो. मानवी जीवनात सदगुरू स्थान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन   असे प्रतिपादन ए.बी.पाटील यांनी जत येथे बोलताना  केले.
    येथील रामराव बिद्यामंदिर पटांगणात झालेल्या या कार्यक्रमात बोलताना श्री. पाटील म्हणाले, मुक्ती म्हणजे कोणत्याही बंधनातून मुक्त होणे. परमेश्वराने मनुष्य जन्माची निर्मीती केली. या जन्मामध्ये मनुष्य जन्माचे अंतिम उद्दिष्ट जाणुन घेऊन आनंदी जीवन जगले पाहिजे. परंतु आजचा मानव नको त्या बंधनामध्ये अडकुन जीवनातील आनंद हिरावून बसला आहे. याला त्याची जाणीव करून देण्यासाठी संतांनी अवतार घेतला, परंतु समाजांनी त्यांना भरपुर त्रास दिला पण  तरीही संतांनी आपले कार्य सोडले नाही.
    जगामध्ये देव एक आहे त्याची जाणीव करून देणे हे मंडळाचे  मुख्य उद्दिष्ट आहे. सर्वांचा देव एक झाला तर संपुर्ण मानव एक होऊन विश्वामध्ये शांतता प्रस्थापित होईल. म्हणून निरंकारी मंडळाची शिकवण सर्वांनी अंगीकारणे आजच्या काळाची गरज आहे असे सांगितले.
    सरस्वती गोरे, नम्रता गोरे, सुखदेव गोरे यांनी भक्तीरचना सादर केली.  विजय टेंगले,सुरेश कोळी  यांनी विचार भक्तीरचनाद्वारे आपला भाव प्रगट केले. सुत्रसंचलन प्रकाश माने यांनी केले. जोतिबा गोरे, सेवादल संचालक संभाजी साळे यांच्या  मार्गदर्शनाखाली सेवादल कार्यकर्ते,भक्तांनी केला.

No comments:

Post a Comment