जत,(प्रतिनिधी)-
संत निरंकारी चँरिटेबल फौडेशनच्यावतीने सांगली निरंकारी भक्तांनी पुरग्रस्त असलेल्या सांगली शहर व बहुतांश गावांमध्ये जाऊन गावाची व घरांची स्वच्छता करून माणुसकीचे दर्शन घडवित आहेत.
सांगली जिल्ह्यातील संत निरंकारी मंडळाच्या भक्तांनी गेल्या ६ आँगस्टपासुन पुरामध्ये अडकलेल्या स्थलांतरित नागरीकांना मंडळामार्फत सांगली येथे ९ ठिकाणी तसेच वाळवा, पलुस,कडेगांव, शिराळा इत्यादी तालुक्यांमध्ये ५ असे एकुण १४ ठिकाणी सुमारे ३ ते ४ हजार नागरिकांना मोफत दोन वेळच्या जेवणाची सोय करीत आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील निरंकारी भक्तांनी पुरग्रस्त नागरीकांना धान्य, बिस्किट,बिसलरीचे पाणी, नवीन कपडे,ब्लँकेट इत्यादी संसार उपयोगी साहित्य देऊन मोठ्या प्रमाणात मदतीचा हातभार लावला. या सर्व उपक्रमाचे महाराष्ट्राचे सामाजिक व न्याय मंत्री सुरेश खाडे,खासदार संजय पाटील,आमदार सुधीर गाडगीळ, सांगली महानगर पालिकेच्या महापौर संगीता खोत यांनी प्रशंसा केली व मंडळाचे आभार मानले.
सांगली येथे पुरग्रस्त नागरीकांची सेवा गेले ४ ते ५ दिवसांपासुन करीत आहेत. हे कार्य सांगली पुरते मर्यादित नसुन जवळजवळ संपुर्ण देशांमध्ये निरंकारी मंडळ एका परमेश्र्वराची ओळख करून देऊन माणसामध्ये असलेल्या माणुसकीचे दर्शन घडवुन देत आहेत. विशेष करून जत भागातील कर्नाटक हद्दीजवळुन जत सांगली सुमारे १००-१५० किमी अंतर असुन सुध्दा निरंकारी मंडळाचे कार्यकर्ते सांगलीत आले आहेत. जत शाखेचे जोतिबा गोरे व संभाजी साळे यांचे बरोबर सुमारे १५० सेवादल व भक्त सांगली येथील मानव सेवेसाठी सहभाग घेतला.
संत निरंकारी मंडळाचे सेवादल विभागाचे क्षेत्रिय संचालक जगन्नाथ निकाळजे व सांगली संयोजक जालिंदर जाधव यांचे मार्गदर्शन खाली सांगली, मिरज, जत, तासगाव, कवठेमहांकाळ सलगरे, देशिंग, खानापुर, आटपाडी, विटा, पलुस, शिराळा,कडेगाव वाळवा नरवाड या तालुक्यातील भागातील जवळ जवळ दररोज दोन हजार सेवादल संत महापुरुष पुरग्रस्त नागरीकाची सेवा करुन माणुसकीचे दर्शन घडवित आहेत.
No comments:
Post a Comment