Tuesday, January 14, 2020

(माहित आहे का?) अक्षय करतोय विशी-तिशीतल्या अभिनेत्रींशी रोमांस


बॉलिवूडमध्ये स्टार अभिनेते वय झालं तरी नायक म्हणून काम करत आहेत. त्यांचा हा रोमांस अगदी 23 ते 27 वय वर्षे असलेल्या अभिनेत्रींशी चाललेला असतो. आज शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खान, अमिर खान या कलाकारांनी पन्नाशी ओलांडली आहे,पण ते आजही विशी-तिशीतल्या अभिनेत्रींसोबत पडद्यावर रोमांस करताना पाहायला मिळतात. यापूर्वीही वयाचे अंतर असलेल्या जोडींचे चित्रपट आले. प्रेक्षकांनी किंवा चाहत्यांनी काहींना स्वीकारले काहींना नाही. पण हा ट्रेंड चालतच आला आहे. आज अक्षयकुमार 52 वर्षांचा आहे. पण अजूनही फिट आहे. त्यामेळे तोही विशी-तिशीतल्या अभिनेत्रींसोबत रोमांस करताना पाहायला मिळणार आहे. सुपर 30 आणि बाटला हाऊस फेम मृणाल ठाकूर ही बेलबॉटममध्ये अक्षयकुमारसोबत दिसणार आहे. मृणालचं वय 27 आहे. अक्षय आणि मृणालच्या वयात तब्बल निम्मं अंतर आहे. अक्षय आणखीही अशाच वयाच्या अभिनेत्रींसोबत आपल्याला दिसणार आहे

बेलबॉटम हा चित्रपट निखिल आडवाणी दिग्दर्शित करत असून या पिरियड ड्रामा चित्रपटात अक्षयसोबत मृणाल मुख्य भूमिका निभावत आहे. अक्षय जासूसच्या भूमिकेत आहे. मृणाल सध्या जर्सी आणि तुफानच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. माजी मिस वर्ल्ड मानुसी छिल्लर पृथ्वीराज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा चित्रपट ऐतिहासिक पृष्ठभूमिवर आधारीत आहे. पृथ्वीराज चौहान यांची भूमिका अक्षयकुमार करत असून संयोगिताची भूमिका मानुषी करत आहे. मानुषीचं वय फक्त 22 आहे. मानुषीने 2017 मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.
हॉरर कॉमेडी असलेल्या लक्ष्मी बॉम्ब चित्रपटात अक्षयसोबत 27 वर्षांची कियारा आडवाणी प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. हा मुनी 2 या तामिळ कॉमेडी चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट डरपोक व्यक्तिरेखा असलेल्या राघव नावाच्या व्यक्तीभोवती फिरतो. 5 जूनला चित्रपट रिलिज होणार आहे. 29 वर्षांची कृती सेनन पुन्हा एकदा बच्चन पांडे चित्रपटाद्वारा अक्षयसोबत दिसणार आहे. 2014 मध्ये आलेल्या वीरम या तामिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे. कमी वयाच्या अभिनेत्रींना हिट चित्रपटांची गरज असते. त्यांना बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या स्टार कलाकारांसोबत काम करणं भाग असतं.  हे बडे कलाकारच त्यांच लाईफ बनवतात. त्यामुळे या अभिनेत्री कलाकारांचं वय पाहात नाहीत.-मच्छिंद्र ऐनापुरे  



No comments:

Post a Comment