Monday, January 6, 2020

पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार

जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक कल्याण समिती सांगली जिल्हा सदस्य  सलीमभाई गवंडी,जत तालुका काॅन्ट्रॅक्टर असोशिएशन व बांधकाम कामगार संघटना, एसजी ग्रुप, अनमोल महिला ग्रुप व जत तालुका मुस्लिम समाजाच्यावतीने पञकार दिनानिमित्त जत तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

 जत येथील हाॅटेल एसके फुडलॅन्डच्या हाॅलमध्ये हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी जतचे तहसिलदार सचिन पाटील होते.म्हैशाळचे उपअभियंता श्री.खरमाडे व जत तालुक्यातील सर्व पञकार बंधु, बांधकाम कामगार स्ञी पुरुष ,अनमोल महिला ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.
सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमीचे पूजन करण्यात आले. पत्रकारांचा सत्कार तहसिलदार सचिन पाटील, उपअभियंता खरमाटे व इतर अन्य मान्य वरांच्या हस्ते करण्यात आला. पञकारांच्या हस्ते करणेत आला.
 प्रास्ताविक सलीमभाई गवंडी यांनी केले. तसेच मार्गदर्शक भाषण पञकार दिनराज वाघमारे,मनोहर कोकळे,मारुती मदने यांनी केले.तहसिलदार सचिन पाटील यांनी पञकारांचे समाजातले महत्वाचे स्थान व कार्य याबद्दल कौतुक केले.त्यानंतर आभार देवराज बल्लारी यांनी मानले.

No comments:

Post a Comment