बॉलिवूडमधील 'ऑल टाईम हीट' जोडी म्हणजे अभिनेता ऋषी कपूर आणि नितू कपूर. 'जहरीला इन्सान' या चित्रपटाच्या सेटवर ओळख झालेल्या या जोडीच्या लग्नाला आता जवळपास ४0 वर्ष झाली आहे. मात्र त्यांचं एकमेकांप्रतीचं प्रेम, आदर यत्किंचितही कमी झालेला नाही. 'जहरीला इन्सान' या चित्रपटाच्याच वेळी या दोघांमधलं प्रेम खुललं आणि १९८0 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. परंतु ऐन लग्नात नितू आणि ऋषी कपूर बेशुद्ध पडले होते. या मागचं कारण नितू कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
२२ जानेवारी १९८0 साली ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली. या लग्नामध्ये यो जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी अनेक मान्यवर, दिग्गजांनी हजेरी लावली होती. मात्र लग्नातच हे दोघं बेशुद्ध पडले आणि एकच गोंधळ निर्माण झाला.
आमच्याच लग्नात आम्ही बेशुद्ध पडलो होतो. खरं तर बेशुद्ध पडण्यामागचं कारण दोघांचंही वेगवेगळं होतं. मी लग्नात जो लेहंगा परिधान केला होता. तो प्रचंड जड होता. त्यामुळे मला त्रास होत होता आणि तो सांभाळत असतानाच मी बेशुद्ध जाले. तर ऋषी यांचं बेशुद्ध पडण्यामागचं कारण वेगळं होतं. लग्नात बरेच पाहुणे आले होते. फार गर्दी झाली होती. कदाचित ही गर्दी पाहूनच त्यांना चक्कर आली असावी. परंतु आम्हा दोघांनाही बरं वाटायला लागल्यानंतर आमचं लग्न सुरळीतपणे पार पडलं, असं नितू कपूर यांनी सांगितलं.
दरम्यान, नितू कपूर या कायम ऋषी यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या असल्याचं पाहायला मिळतं. मध्यंतरी ऋषी कपूर यांच्यावर न्युयॉर्कमध्ये उपचार सुरु होते. यावेळी नितू कपूर सतत त्यांच्यासोबत होत्या.
No comments:
Post a Comment