गृहकर्ज, वाहनकर्ज आणि क्रेडिट कार्ड या
सगळ्यांचे हप्ते एकाच वेळी चुकविण्याची वेळ अनेकांवर येते. अशा वेळी आर्थिक नियोजन
पूर्णपणे कोलमडतं. खर्चाचा ताळमेळ बसवता बसवता नाकी नऊ येतात. हप्ते वेळेत न
भरल्यास सबल स्कोअरही खराब होतो. अशा परिस्थितीत अर्थनियोजन कसे करावे, यासाठीच्या काही टिप्स..
कर्जफेडीचे नियोजन कसे असावे हे तपासण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया.
मासिक उत्पन्न ७५,000 रुपये असलेल्या व्यक्तीचा मासिक खर्च ४0
हजार रुपये आहे. उर्वरित ३५ हजार रुपयांमध्ये या व्यक्तीला गृहकर्ज,
वाहनकर्ज आणि क्रेडिट कार्डचे हप्ते भरावे लागतात. या व्यक्तीकडे २७
लाख ९३ हजार रुपयांची संपत्ती आहे.
या संपत्तीपैकी घराची किंमत जास्त आहे. कर्ज चुकते करण्यासाठी त्यांना घर विकता येणार नाही. ईपीएफ आणि पीपीएफमधून पैसे काढून हप्ते फेडता येणार नाहीत. फिक्स डिपॉझिटमधली रक्कम गरजेसाठी आहे. त्यामुळे ती मोडता येणार नाही. दररोजचा खर्च गेल्यावर या कुटुंबाकडे ३५ हजार रुपये उरतात. सगळे हप्ते मिळून त्यांना ३९,४६८ रुपये भरावे लागतात. अशा परिस्थितीत नेमके करायचे तरी काय?
अशा परिस्थितीत या व्यक्तीने भविष्यात क्रेडिट कार्डवर मोठी खरेदी करू नये. यासोबतच तिने महिन्याचा अनावश्यक खर्च कमी करायला हवा. म्युचुअल फंडावर हुकमी आणि निश्चित स्वरुपाचा परतावा मिळत नाही. त्यामुळे विविध म्युचुअल फंडांमध्ये गुंतवलेली सगळी रक्कम काढून घेऊन त्याचा वापर करता येऊ शकतो.
क्रेडिट कार्डचे पैसे म्युच्युअल फंडाच्या पैशांनी चुकते करता येऊ शकतात. काही रक्कम उरल्यास इतर काही कर्ज फेडण्यासाठी उपलब्ध रकमेचा वापर करता येईल. १८ महिन्यांसाठी वैयक्तिक कर्ज घेतले असल्यास ११ महिन्यांमध्ये फेडून टाकण्याचा प्रयत्न करावा.
No comments:
Post a Comment