Saturday, January 11, 2020

२४ तासांत २८ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

विद्यार्थ्यांवर सातत्याने वाढणारा दबाब आणि त्यातून येणार्‍या तणावामुळे विद्यार्थी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत. मागील १0 वर्षात भारतात ८२ हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. देशात २0१८ या वर्षात दर दिवशी २८ विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरोच्या अहवालात उघड झाले आहे. एक जानेवारी २00९ ते ३१ डिसेंबर २0१८ या कालावधीत आतापयर्ंत ८१ हजार ७५८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.
यामध्ये ५७ टक्के विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मागील पाच वर्षात झाल्या आहेत. तर, वर्ष २0१८ मध्ये १0 हजार १५९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मागील दहा वषार्तील ही सर्वाधिक संख्या आहे. वर्ष २0१८ मध्ये भारतात १.३ लाख जणांनी आत्महत्या केल्या. यामध्ये ८ टक्के विद्यार्थ्यांची संख्या आहे. तर, बेरोजगारीमुळे आत्महत्या करणार्‍यांची संख्या ही १0 टक्क्यांच्या घरात आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक १४४८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. तर, तामिळनाडूमध्ये ९५३, मध्य प्रदेशमध्ये ८६२, कर्नाटकमध्ये ७५५ आणि पश्‍चिम बंगालमध्ये ६0९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. या राज्यांमधील विद्यार्थी आत्महत्या या एकूण आकडेवारीच्या ४५ टक्के इतकी आहे.
शेतकर्‍यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक
बहुतांशी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अपयश आल्यामुळे आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय विद्यार्थी आत्महत्येसाठी इतरही कारणे आहेत. अंमली पदार्थांचे सेवन, तणाव, कौटुंबिक कारणे, नातेसंबंध आदी कारणांमुळेही आत्महत्या होत असल्याचे समोर आले आहे.

   

2 comments:

  1. Garibi ani Arthik sthiti yamule aatmahatya karanaryanchi sankhya atyant alp asun masti vyasan ani yogy margearshan nasalyamule aatmhatya karatat....

    ReplyDelete
  2. Garibi ani arthik sthitimule aatmahatya karanarya mulanchi sankhya khupach kami asate...vyasan, kumar vayach akarshan,ayogy margdarshan,masti yamulech jast aatmhatya karatat.... media vale pan te sagal zakun thevatat....

    ReplyDelete