Tuesday, January 14, 2020

इरफान खान दुसरी इनिंग खेळायला तयार


बॉलीवूडमध्ये आपल्या कसदार अभिनयाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणार्या इरफान खानने हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. आपल्या तीन दशकाच्या फिल्मी करिअरमध्ये त्याने आतापर्यंत 50 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा जन्म 7 जानेवारी 1966 मध्ये जयपूरमध्ये झाला. अलिकडे तो कॅन्सरने ग्रस्त होता. इरफानचं स्वप्न होतं क्रिकेटपटू बनायचंं. पण झाला अभिनेता. त्याच्या करिअरचा सुवर्णकाळ सुरू असताना त्याला आजाराने ग्रासले. आता तो आपल्या करिअरची दुसरी इनिंग खेळायला सज्ज झाला आहे. इरफानने 1988 मध्ये आलेल्या सलाम बॉम्बे चित्रपटाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पण त्याची ओळख 2005 मध्ये आलेल्या रोग चित्रपटाने झाली. यानंतर हासिल, लंचबॉक्स, गुंडे, हैदर, पीकू पान सिंह तोमर, करिब करीब सिंगल, मदारी यशस्वी चित्रपट आले. त्याने ज्युरासिक पार्क आणि स्पायडरमॅन या हॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे.

तिग्मांशू धुलिया यांच्या पान सिंह तोमर चित्रपटात इरफानने एका डाकूची भूमिका केली होती. हा चित्रपट पानसिंह तोमर यांच्या आयुष्यावर आधारित होता. आपली भूक मिटवण्यासाठी रेस ट्रॅकवर धावून आपल्या देशासाठी पदक पटकवणार्या एका युवकाची कथा आहे. पण तो एक दिवस आपल्या हातात बंदूक घेऊन डाकू बनतो. लंचबॉक्समध्ये मुंबईत राहणार्या साजन फर्नांडिसची भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. रितेश बत्रा यांनी दिग्दर्शन केले होते. करीब करीब सिंगल हा चित्रपट 2017 मध्ये आला होता. ॅक्ट्रेस पार्वती आणि इरफान खान यांच्या भोवती हा चित्रपट फिरतो. तनुजा चंद्रा यांनी चित्रपट दिग्दर्शित केला होता. मदारी हा चित्रपट त्याने स्वत:च्या ताकदीवर हिट बनवला. पीकू 2015 आला. या चित्रपटाची कथा दीपिका पादुकोन, अमिताभ बच्चन, इरफान यांच्या अवतीभोवती फिरतो.

No comments:

Post a Comment