अरुंधती भट्टाचार्य- ५८ वर्षीय अरुंधती भट्टाचार्य या भारतीय बँकिंग क्षेत्रातील मोठे नाव. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या त्या चेअरपर्सन आहेत. २0१३ साली प्रतीप चौधरी यांच्यानंतर त्यांनी बँकेची धुरा हातात घेतली. अशा पदावर पोहोचलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. कोलकाता येथील अरुंधती भट्टाचार्य यांना फोर्ब्सने जगातील सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत ३६ वे स्थान दिले आहे.
चंदा कोचर
५३ वर्षीय चंदा कोचर या भारतातील अग्रगण्य खासगी बँक आय.सी.आय.सी.आय.च्या कार्यकारी संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. जोधपूर येथून आलेल्या चंदा यांनी फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत ४३ वे स्थान पटकावले आहे. त्यांनी आय.सी.आय.सी.आय.च्या विविध पदांवर काम केले आहे.
किरण मजुमदार-शॉ
६१वर्षीय भारतीय उद्योजिका किरण या बेंगळुरू येथील बिकॉन लिमिटेड या बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या प्रमुख आहेत. आय.आय.एम. बेंगळुरूच्या देखील त्या प्रमुख आहेत. २0१४ साली त्यांना ऑथमर गोल्ड अवॉर्ड मिळाले होते. फोर्ब्सच्या यादीत त्यांना ९२ वे स्थान मिळाले आहे.
चित्रा रामकृष्णा
१९६३ साली जन्मलेल्या चित्रा रामकृष्णा या भारतीय शेअर बाजारातील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या पहिल्या कार्यकारी संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. याशिवाय त्यांनी एनएसईमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक, लिस्टिंगच्या हेड, उपकार्यकारी संचालिका आणि संचालिका, सेबीच्या डेरीव्हेटीव्ह पॅनलच्या सदस्या, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडच्याच्या कार्यकारी समितीच्या सदस्या म्हणून काम पाहिले आहे.
सुमित्रा महाजन
७१वर्षीय सुमित्रा महाजन या सध्या लोकसभेच्या सभापती आहेत. मीरा कुमार यांच्यानंतर २0१४ साली त्या सभापती बनल्या. चिपळुण येथे जन्मलेल्या सुमित्राताई भारतीय जनता पक्षाच्या सदस्य आहेत. त्या लोकसभेवर आठ वेळा निवडून गेल्या आहेत. महिला सदस्य म्हणून त्यांचा कार्यकाळ मोठा आहे. १६ व्या लोकसभेत त्या सर्वात अधिक वयाच्या महिलांपैकी एक आहेत.
निरुपमा राव
६४ वर्षीय निरुपमा राव या केरळमधून आल्या असून, त्या भारतीय परराष्ट्र अधिकारी आहेत. अमेरिकेत भारताच्या राजदूत म्हणून त्यांनी काम केले आहे. भारताच्या परराष्ट्र सचिव म्हणून दोन वर्षे त्यांनी काम केले आहे. परराष्ट्र मंत्रालयातील त्या पहिल्या महिला प्रवक्त्या होत्या.
मेधा पाटकर
६0 वर्षीय सामाजिक कार्यकर्त्या आणि नंतर राजकीय कार्यकर्त्या बनलेल्या मेधा पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलनात मुख्य भूमिका बजावली. गुजरातमधील नद्यांवर होणार्या धरणांना त्यांनी विरोध केला. भारतीय सामाजिक चळवळीमधील त्या अग्रगण्य कार्यकर्त्या आहेत. २0१४ साली त्या आम आदमी पक्षातर्फे निवडणुकीस उभ्या होत्या.
किरण बेदी
६५ वर्षीय किरण बेदी या अमृतसर येथून आलेल्या नवृत्त पोलीस अधिकारी आहेत. १९७२ साली त्या भारतीय पोलीस सेवेत दाखल झाल्या. त्या मूळच्या टेनिस खेळाडू. पश्चिम दिल्लीमध्ये त्यांच्या नेतृत्वात टीमने गुन्हेगारांचे कंबरडे मोडले. संयुक्त राष्ट्रात पहिल्या सिव्हीलियन पोलीस अँडव्हायजर म्हणून त्यांनी काम केले. २0१५ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला
No comments:
Post a Comment