बॉलिवूड कलाकार चित्रपटातल्या आपल्या
भूमिकेत स्वत:ला झोकून देण्यासाठी काहीही करायला
तयार असतात. अमिरखान याबाबतीत आघाडीवर आहे. पण यात महिला कलाकारही काही मागे नाहीत. यांनीही भूमिकेनुसार
स्वत:मधे बदल केला आहे. या अभिनेत्री वजन
वाढवतात आणि घटवतातही. यासाठी त्यांना आपल्या डायटमध्ये बदल करावा
लागतो. काही अभिनेत्रींनी अशा प्रकारच्या एक्सपेरिमेंट केल्या
आहेत. आता या यादीत कृति मेननचंही नाव सामिल झालं आहे.
तिला आगामी मिमि चित्रपटासाठी तब्बल 15 किलो वजन
वाढवायचं आहे. हा चित्रपट सरोगेसीवर आधारित आहे. स्लिम बॉडीसाठी ओळखल्या जाणार्या या अभिनेत्रीला वजन
वाढवण्याबरोबरच स्वत:लाही अभिनेत्री म्हणून सिद्ध करावं लागणार
आहे. अशा प्रकारे आपल्या शरीरासोबत एक्सपेरिमेंट करणार्या काही महिला कलाकारांमध्ये विद्या बालन आहे. कटरिना
कैफ आहे. इतकंच काय प्रियंका चोप्रा, भूमि
पेडणेकर, ऐश्वर्या रॉय, कंगना राणावत यांनाही भूमिकेसाठी स्वत:मध्ये बदल करावा
लागला आहे.
अभिनेत्री विद्या बालन हिने 2011 मध्ये आलेल्या द डर्टी पिक्चरसाठी वजन वाढवलं होतं.
यात तिने सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. या कामामुळे तिचे खूपच कौतुक झाले होते. प्रियांका चोप्राने
सात खून माफ आणि मेरी कॉम या चित्रपटांसाठी आपले वजन वाढवले होते. सात खून माफमध्ये तिने एका वयस्क महिलेची भूमिका साकारली होती. मेरी कॉममध्ये एका बॉक्सरची बॉडी बनवण्यासाठी तिला आपला वेट गेन करावा लागला
होता.
फराह खान दिग्दर्शित तीस मार खां
चित्रपटासाठी कटरिना कैफला आपले वजन कमी करावे लागले होते. यानंतर आलेल्या मेरे ब्रदर की दुल्हन साठी तिला वेट गेन
करावं लागलं होतं. एकापेक्षा एक हिट चित्रपट देणार्या अभिनेत्री भूमि पेडणेकरला आपल्या दम लगा के हैशा या पहिल्याच चित्रपटासाठी
वजन वाढवायला लागलं होतं. हा तिचा चित्रपट हिट ठरला होता.
भूमिने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.बॉलिवूड क्विन कंगना राणावत हिलाही आपल्या आगामी थलाइवी चित्रपटासाठी वजन वाढवणं
भाग पडलं आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूची माजी मुख्यमंत्री
जे. जयललिता यांची भूमिका साकारत आहे. तिला
हुबेहुब दिसण्यासाठी प्रोथेस्टिक मेकअपचे ओझेही सहन करावे लागले आहे.
जॅकलिन फर्नांदिसला तिच्या किक (2014) चित्रपटासाठी आपले 10 किलो
वजन वाढवावे लागले होते. तिच्यासमोर सलमान खान प्रमुख भूमिकेत
होता. ऐश्वर्या रॉयने उमराव जान आणि गुरूसाठी
वेट गेन केलं होतं. गुरू चित्रपटात तिने विवाहित महिलेची भूमिका
साकारली होती. यासाठी तिला वाढत्या वयाबरोबरच स्वत:ला जाड दाखवावं लागलं होतं. स्वत:च वजन वाढवणं किंवा कमी करणं तसं धोक्याचं आहे. पण हे
कलाकार विशेषतज्ज्ञ ट्रेनर्स आणि डायटिशियनच्या गायडेन्समध्ये असतात. डाएट आणि वर्क आऊटच्या संयुक्त मिश्रणाने हे शक्य आहे. तज्ज्ञाच्या देखरेखीशिवाय वजन वाढवणं-कमी करणं धोक्याचं
असतं. यामुळे किडनी, डोळे, लिव्हर यांवर वाईट परिणाम होऊ शकतो.
No comments:
Post a Comment