बॉलीवूड अभिनेता ऋत्विक रोशन याने केवळ
प्रणयरम्य भूमिकाच नव्हे तर आपल्या माचोमॅन छबीनेही प्रेक्षकांना दिवाने बनवले आहे. 10 जानेवारी 1974 रोजी मुंबई येथे
जन्मलेल्या ऋत्विकला अभिनय कला वारसाने मिळाली आहे. त्याचे वडिल
राकेश रोशन प्रसिद्ध फिल्मकार आणि अभिनेता आहेत. त्यांच्या आजोबांनी
संगीत क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. ऋत्विकने बालकलाकार म्हणून
आशा, आप के दिवाने, आसपास आणि भगवान दादा
सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिरोच्या भूमिकेत त्याने
पहिल्यांदा 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या कहो ना प्यार है मध्ये
काम केले. वडिल राकेश रोशन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला
होता. हा चित्रपट सुपरहिट झाला.
लहानपणी बोलताना अडखळणार्या ऋत्विकला अॅक्टिंगची आवड होती.
यामुळे त्याच्या करिअरलाही अडथळा निर्माण होऊ शकत होता,पण यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आणि या इंडस्ट्रीत आपली स्वता:वी वेगळी ओळख निर्माण केली. आज त्याची गिनती बॉलीवूडच्या
टॉप अॅक्टर्समध्ये होते. बहीण सुनैना आणि
आई पिंकी यांच्याशी त्याची चांगली बॉन्डिंग आहे. आईला त्याचा
सुपर 30 चित्रपट इतका आवडला की, तिने नऊ
वेळा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिला. बहीण सुनैनाने एका मुलाखतीत
सांगितले आहे की, तिला कॅन्सरसारखा गंभीर आजार झाला होता,
तेव्हा तिला रोगाशी लढण्याची ताकद ऋत्विक आणि वडिलांकडून मिळाली.
ऋत्विकने 2000 मध्ये सुजैन खान हिच्याशी विवाह केला होता.
त्यांना दोन मुले आहेत, रेहान आणि रिधना.
2014 मध्ये या जोडीने आपसी सहमतीने तलाक घेतला. तलाकनंतरही दोघे चांगले मित्र आहेत. नेहमी एकत्र असतात.
मुलांसोबत डिनर डेटसाठी जात असतात. आपल्या बिझी
शेड्युलमधून वेळ काढून मुलांसोबत फिरायला जातो. वडिलांसोबत त्याची
चांगली मैत्री आहे. ते एकमेकांना सपोर्ट करतात. राकेश रोशन यांना कॅन्सर झाला होता, तेव्हा ऋत्विकने
त्यांना पूर्णपणे साथ दिली.
ऋत्विक लवकरच क़्रिश 4 मध्ये दिसणार आहे. सध्या या स्क्रिप्टवर
काम सुरू आहे. ऋत्विक आपल्या फिटनेसची अधिक काळजी घेतो.
रोज जीमला जातो. तो चांगला डान्सर आहे.
आपल्या डाएट चार्टनुसार तो भोजन घेतो.
No comments:
Post a Comment