जत,(प्रतिनिधी)-
राजर्षी शाहू महाराज यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त प्रज्ञासूर्य बहुद्देशिय संस्था घरनिकी ता.मंगळवेढा जि. सोलापूर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत 9 वी ते 12 वी या गटात कु. प्रज्ञा बाबासाहेब काटे हिचा 'लोकशाही पुढील आव्हाने' या विषयीच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाल्याने कु. प्रज्ञा बाबासाहेब काटे हिस प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन तिचा सत्कार करण्यात आला.
कु. प्रज्ञा बाबासाहेब काटे ही श्री.रामराव विद्यामंदीर जत जि. सांगली येथील प्रशाळेत इयत्ता नववी या वर्गात शिकत आहे.तिला मार्गदर्शन करण्यासाठी सुनिल सुर्यवंशी, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले.
Heartily congratulations
ReplyDelete