आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्हय़ात एका मुलीने प्रियकरासाठी स्वत:च्याच घरी चोरी करून २0 तोळे सोन्याचे दागिने लांबवले आहेत. हे घरातून चोरलेले सोने तिने प्रियकराला दिले. त्याने या पैश्यांतून कार खरेदी केली. या मुलीची इंस्टाग्रामवरून मुलाशी ओळख झाली होती. त्यांचे रूपांतर प्रेमात झाले. मुलाने तिच्याकडे कार घेण्यासाठी पैश्यांची मागणी केली. त्यासाठी तिने स्वत:च्याच घरी चोरी करून प्रियकराला सोन्याचे दागिने दिले आहेत. मात्र, पोलिस तपासात तिची चोरी पकडण्यात आली.तिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेनंतर मुलीच्या कटुंबीयांना धक्का बसला असून आपली मुलगी असे करेल यावर त्यांचा विश्वासच बसत नाही.
गोदावरी जिल्हय़ात यमनमध्ये राहणार्या कारी सतीशची ओळख इंस्टाग्रामवर एका मुलीशी झाली. ती मुलगी सूर्यापेटमध्ये एम. फार्मसीचे शिक्षण घेत आहे. ती आजी- आजोबांसोबत राहते. सतीशसोबत अनेकदा भेट झाल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध झाले. त्यानंतर कार घेण्यासाठी सतीशने मुलीकडे पैसे मागितले. आपल्या प्रियकराला कार घेऊन देण्यासाठी मुलीने आपल्या घरातच चोरी केली. आजोबांनी मेहनतीने जमवलेले सुमारे २0 तोळे सोन्याचे दागिने तिने चोरले आणि ते सतीशला दिले. सतीशने ते सोन्याचे दागिने विकून कार खरेदी केली. घरातील दागिन्यांची चोरी झाल्यामुळे मुलीच्या आजोबांनी सूर्यापेट पोलिस ठाण्यात १४ एप्रिलला तक्रार दाखल केली. त्यात त्यांनी घरातील भाडेकरूंवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी तक्रार दाखल करून तपासाला सुरुवात केली. मात्र, भाडेकरुंविरोधात त्यांना संशयास्पद काहीही आढळले नाही. त्यानंतर त्यांनी घरातील सदस्यांचे फोन कॉल डेटा तपासायला सुरुवात केली. त्यात मुलीने सतीशला अनेकदा फोन केल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच मुलीने घरात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर मुलीच्या कटुंबीयांना धक्का बसला असून ती चोरी करेल यावर घरच्यांचा विश्वास बसत नाही
No comments:
Post a Comment