vकॉम्प्युटरवर काम करत असताना, काही विचारात असताना बोटे चाटण्याची सवय आपल्यापैकी कोणाला असेल, तर ही सवय ताबडतोब सोडवा. कारण, ही सवय आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. काही लोकांना रिकामे बसले असले किंवा विचारात असले, की तोंडात बोटे घालून बसल्याचे पाहिले असेल. ही सवय अर्थातच चांगली नाही. सर्वसाधारणपणे लोक म्हणतात त्यामुळे आळस, थकवा दूर होतो; पण संशोधनानुसार या सवयीचा आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे सिद्ध झाले आहे.
सांधे आखडणे : हावर्ड मेडिकल स्कूलच्या अहवालानुसार बोटे चाटण्याची सवय नक्कीच वाईट आहे. सतत बोटे चाटल्याने सांध्यांच्या पेशी खराब होतात. त्यामुळे हाताच्या सांध्यांची पकड कमजोर होते. बोटे सतत चाटत राहिल्याने सांध्यांमध्ये सूज आणि वेदना होतात. त्यामुळे हाडे कमजोर होतात, तसेच छोटे फ्रॅरही होऊ शकते. बोटे चाटल्याने सांधे आखडतात किंवा गाठिया रोग होतो, असे नाही; पण बोटे चाटण्याची सवय सांधे आखडणे किंवा गाठिया रोग होण्यास कारण ठरू शकते.
बोटांच्या सांध्यांत वेदना : सतत बोटे चाटण्याने बोटांच्या पेशींचे नुकसान होते. बोट चाटताना जो आवाज येतो, तो सांध्यांमध्ये असलेल्या वंगणातून निघणार्या बुडबुड्याचा असतो. सतत बोटे चाटत राहिल्यास हे वंगण कमी होऊ लागते, तसेच बोटांचे सांधे खरबरीत होऊ लागतात. तेव्हा बोटे चाटताना असा आवाज येऊ लागतो. बोट चाटताना आपल्याला वेदना झाल्या नाहीत, तरीही हळूहळू बोटांच्या सांध्यांमध्ये वेदना होऊ लागतात.
हाताच्या सांध्यांची पकड ढिली : सतत बोटे चाटल्याने त्यांच्यातील तरल पदार्थ कमी होतो आणि हे वंगण पूर्णपणे कमी झाले, तर सांधे आखडू शकतात. संधिवाताने पीडित व्यक्?तीला बोटे चाटण्याची सवय असेल, तर त्याला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. अमेरिकन बोर्ड ऑफ फॅमिली मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार २00 लोकांच्या हातांचा एक्सरे काढला. त्यापैकी २0 टक्के लोक असे होते, ज्यांना सतत बोटे चाटायची सवय होती. परिणामी, जे लोक सतत बोटे चाटत होते, त्यांच्या हाताची पकड सैल झाली होती. असा प्रकार कुणासोबत घडत असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घेणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment