पावसाळयात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठय़ाला आवश्यक आर्थिग केल्याची खात्री करून घ्यावी. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. विशेषत: टिनाच्या घरात राहणार्या नागरिकांनी पावसाळयात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विजेच्या खांबाना, ताण ताराला जनावरे बांधू नयेत. त्यास दुचाकी टेकवून ठेवू नये किंवा खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. घरावरील डिश किंवा अँन्टीना वीज तारांपासून दूर ठेवावेत. ओल्या कपड्यावर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही याची दक्षता घ्यावी.
मुसळधार पाऊस आणि वादळीवारा यामुळे झाडांच्या मोठय़ा फांद्या तुटून वीज तारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीज खांब वाकतात. त्यामुळे तारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीज प्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्या तारापासून सावध रहावे. त्यांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्नकरू नये. याशिवाय अतवृष्टी किंवा वादळाने तुटलेल्या वीज तारा, खांब रस्त्यांच्या बाजुचे फिडर पिलर, ट्रान्सफॉर्मरचे लोखंडी कुंपण, फ्युजबॉक्स तसेच घरातील ओलसर उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड याकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता असते. थोडी दक्षता बाळगल्यास या अप्रिय दुर्घटना टाळणे सहज शक्य असते.
No comments:
Post a Comment