Wednesday, July 3, 2019

वक्तृत्व स्पर्धेत सृष्टी सुर्यवंशी हिचा प्रथम क्रमांक

जत,(प्रतिनिधी)-
राजर्षी शाहू महाराज यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त प्रज्ञासूर्य बहुद्देशिय संस्था घरनिकी ता.मंगळवेढा जि. सोलापूर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत 5 वी ते 8 वी या गटात कु. सृष्टी सुनिल सुर्यवंशी हिने 'डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य' या विषयी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविले.
कु. सृष्टी सुर्यवंशी हिस प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन तिचा सत्कार करण्यात आला. कु. सृष्टी सुनिल सुर्यवंशी ही श्री.रामराव विद्यामंदीर जत जि. सांगली येथील प्रशाळेत इयत्ता सहावी या वर्गात शिकत आहे.तिला मार्गदर्शन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment