देशांतर्गत स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात राज्याचा हिस्सा सर्वाधिक राखण्यात महाराष्ट्राला यश मिळाले असून ही टक्केवारी १५ टक्के इतकी आहे. सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नात गेल्या पाच वर्षात भरीव वाढ झाली आहे. २0१३-१४ सालचे १६.५0 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न २0१८-१९ मध्ये २६.६0 लाख कोटी इतके झाले आहे. राज्याचे दरदोई उत्पन्न २0१७-१८ मध्ये १ लाख ७६ हजार १0२ रुपये होते ते वाढून २0१८-१९ मध्ये १ लाख ९१ हजार ८२७ रुपये इतके झाले.
मध्यप्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यापेक्षा ते अधिक आहे. राज्यावरचे कर्जाचे प्रमाण घटले असून स्थूल राज्य उत्पन्नाशी कर्जाचे असलेले प्रमाण हे २0१४-१५ च्या १६.५ टक्क्यांहून कमी होऊन ते १५.६ टक्के इतके झाले आहे. राज्य आर्थिकदृष्ट्या उत्तम प्रगती करत असून एकत्रित वित्तीय सुधारणेच्या मार्गातर्गत घालून दिलेल्या वित्तीय शिस्तीचे पालन राज्य काटेकोरपणे करत असल्याने राज्याला हे यश मिळाले आहे. स्थूलमानाने रोजगारीपासून मिळणारे म्हणजेच र्शमजन्य आणि मालमत्तेपासून मिळणारे, असे उत्पन्नाचे दोन प्रकार पाडता येतात. र्शमजन्य उत्पन्नात वेतनाचा समावेश होतो. मालमत्तेपासून मिळणार्या उत्पन्नात खंड, व्याज व नफा यांचा अंतर्भाव होतो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या निर्मितीत भूमी, मजूर, भांडवल व प्रवर्तक हे चार घटक सहभागी असतात. या उत्पादक घटकांच्या सेवेचे मोल अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात केले जाते. संपत्तीच्या उपयोगातून निर्माण होणारा वा मानवी र्शमांच्या मोबदल्यात मिळणारा, पैशाच्या वा अन्य सामग्रीच्या स्वरूपातील लाभ उत्पन्नात समाविष्ट असतो. उत्पन्न-प्रकारांचे काटेकोर वर्गीकरण तात्विक विवेचनात करता येते. परंतु विविध उत्पन्नप्रकार एकमेकांत मिसळत असल्यामुळे असे वर्गीकरण व्यवहारात करता येणे कठीण असते. वैयक्तिक उत्पन्नाचे वास्तविक व द्रव्य उत्पन्न, समग्र व निव्वळ उत्पन्न, अर्जित व अनर्जित उत्पन्न असे पोटभेद करता येतात. वैयक्तिक उत्पन्नाखेरीज राष्ट्रीय उत्पन्न ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. उत्पादनास साहाय्यभूत ठरणार्या उत्पादक घटकांना एकूण उत्पन्नाचा भाग किती प्रमाणात मिळावा, हे ठरविणारे अनेक सिद्धांत अर्थशास्त्रज्ञांनी मांडले आहेत. वेगवेगळ्या उत्पादन घटकांनी मिळून निर्मिलेल्या उत्पन्नाची चारही घटकांत कशी वाटणी करावी, ही एक महत्त्वाची समस्या आहे. उत्पन्नाची विभागणी कोणत्या तत्त्वावर ठरवावी यावर अर्थशास्त्रज्ञांत एकमत नाही. सनातन अर्थशास्त्रज्ञांनी ही विभागणी सीमांत उत्पादकता सिद्धांताच्या आधारावर केली आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा चारही उत्पादक घटकांना मिळणार्या उत्पन्नाची बेरीज करून काढता येतो. व्यक्ती व उत्पादनसंस्था ह्यांच्या उत्पन्नांची बेरीज करणे, ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची दुसरी पद्धत होय. औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या राष्ट्रांत कमीअधिक विषमता असल्याचे दिसून येते.
No comments:
Post a Comment