दुचाकी वाहनात मध्यमवर्गीयांची सर्वाधिक पसंती मोटार बाईक हेच असून तरुणाईला तर बाईकचे वेडच असते. दररोज बदलत्या पेट्रोल किमतींचा परिणाम वाहन ग्राहकांवर होत असतोच आणि मग वेगवान, नवीन तंत्रज्ञान आणि कमी इंधनात जास्त मायलेज देणार्या वाहनांना साहजिकच पसंती मिळू लागते. देशातील अनेक दुचाकी निर्मात्या कंपन्या जादा मायलेज देणार्या बाईक्स बाजारात आणत आहेत तसेच इलेक्ट्रिक बाईकही लाँच होऊ लागल्या आहेत.
यात बाईक ग्राहकांना मोठाच दिसला देऊ शकेल अशी बाईक लवकरच बाजारात येण्याची शक्यता असून ही बाईक चक्क हवेवर चालेल. तिला पेट्रोल अथवा विजेची गरज भासणार नाही.
लखनौच्या राजकीय निर्माण निगमचे माजी मुख्य प्रबंधक व एसएमएस इंस्टीटयूट ऑफ टेक्नोलॉजीचे प्रोफेसर राजसिंह यांनी त्यांचे सहकारी, प्रो. ओंकारसिंग यांच्यासह हवेवर चालणारे इंजिन तयार केले असून त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. यामुळे राजसिंह यांना हवाई प्रोफेसर असे नाव पडले आहे. या दोघांनी हवेवर चालणार्या इंजिनच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. हे इंजिन मोटार बाईकला बसविले गेले असून त्यात पेट्रोल ऐवजी हवा भरली जाते. हवेपासून उर्जा निर्माण करण्यात हे इंजिन मुख्य भूमिका निभावते. त्यामुळे प्रदूषणावर ५0 टक्के नियंत्रण आणता येते. या इंजिनचा वापर दुचाकीमध्ये करण्याचा उद्देश ही वाहने पेट्रोल ऐवजी हवेवर चालावी हाच असून त्यामुळे इंधन खर्च कमी होणार आहे, प्रदूषण कमी होणार आहे. ५ रुपयांची हवा टाकीत भरली की ४0 किमीचा प्रवास होऊ शकणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे वाहनाच्या वेगावर कोणताही परिणाम होणार नाही. ही एरो बाईक ताशी ७0 ते ८0 किमी वेगाने धावू शकणार आहे.
या इंजिनाचा वापर दुचाकीमध्ये करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली गेली आहे. या इंजिन मध्ये दोन एअर टँक व टर्बाईन दिले गेले आहे. इंजिनात काठोकाठ हवा भरली की गरज असेल तेव्हा ही कॉम्प्रेस केलेली हवा पोर्टमधून टर्बाइनमध्ये येते आणि रॅशनल फोर्स निर्माण होतो. यालाच टॉर्क म्हटले जाते. रोटेशनल फोर्सने बाईक चालविली जाते. भारतात दुचाकी वाहन वापराचे प्रमाण मोठे असून त्यात ७७.८ टक्के बाईक्स आहेत. त्यामुळे या इंजिनचा प्रयोग सर्वप्रथम बाईकवर केल्याचे प्रो. राजसिंह यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment