Wednesday, July 31, 2019

मुलाच्या खून प्रकरणी जत येथील एकाला जन्मठेप

जत,(प्रतिनिधी)-
सिध्दनाथ (ता. जत) येथील उदयसिंह ऊर्फ सोनू बलराज रुपनर (वय १५) या मुलाच्या खूनप्रकरणी
विजय शिवाजी  माने (३५, रा. मंगळवार पेठ, जत) याला जन्मठेपेची शिक्षा काल सत्रन्यायाधीश विजय पाटील यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. ही घटना २५ मे २०१५ रोजी घडली होती.

पांढरेवाडी जिल्हा परिषद शाळेत उदयसिंग याचे वडील बलराज लक्ष्मण रुपनर शिक्षक आहेत. बलराज व पली छायादेवी, मुलगा उदयसिंह, सोमेश्वर व मुलगी ऋतुजा हे सर्वघटनेदिवशी सांगलीत शिक्षक अधिवेशनासाठी गेले होते. कामे आटोपून जतमध्ये यायला त्यांना रात्रीचे बारा वाजले. दरम्यान, सिध्दनाथला जाण्यास बस नसल्याने छायादेवींनी आरोपी विजय माने याची गाडी भाड्याने ठरवली. बलराज दुचाकी घेऊन पुढे गेले. चारचाकी गाडीतून छायादेवी, ऋतुजा, उदयसिंह, सोमेश्वर निघाले. मात्र, विजयची ऋतुजावर वाईट नजर होती, तसेच छायादेवी यांच्या अंगावरील सोने व पैसे लुबाडण्याच्या हेतूने त्याने सिध्दनाथ फाट्यावर गाडी बंद पाडली. दुसरी गाडी बघून देतो, म्हणून त्याने उदयसिंहला सोबत नेले.
 काही अंतरावरुन उदयसिंहच्या ओरडण्याचा आवाज आल्याने छायादेवी व ऋतुजा, सोमेश्वर तिकडे धावून गेले. त्यावेळी विजय याने याने उदयसिंह याला चाकूने वार करून जखमी केल्याचेदिसून आले. त्यावेळी धावून आलेल्या आईसह तिघांवरही त्याने वार केले व त्यानंतर पळ काढला. उदयसिंहला उपचारास घेऊन जात असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर तातडीने जत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक
श्रीकांत पिंगळे यांनी तातडीने आरोपीस अटक केली.
त्याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले.
फिर्यादी ऋतुजा रुपनर, जखमी सोमशेखर रूपनर, डॉ. नितीन निनाल, डॉ. विजय हांडे, मुख्याध्यापक रामचंद्र
राठोड, तपास अधिकारी श्रीकांत पिंगळे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. त्यानुसार आरोपीस जन्मठेपेची
शिक्षा सुनावण्यात आली.


No comments:

Post a Comment