जत ,(प्रतिनिधी)-जत तालुक्यातील कुडणुर, शिंगणापूर या गावांना एसटी बस ची सोय 15 वर्षापासून बंद आहे त्यामुळे गावातील नागरिक,विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक, दिव्यांग या प्रवाशांची गैरसोय होत आहे तातडीने या गावांना एसटी बस ची सुविधा मिळावी या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे,विलास सरगर यांनी आगारप्रमुख यांना दिले .
कुडणुर शिंगणापूरच्या ग्रामस्थांना एसटी बसची सुविधा नसल्याने पायी चालत डफळापूर किंवा कोकळे या ठिकाणी यावे लागते हे अंतर 2 ते 7 किमी अंतर आहे यामध्ये ग्रामस्थांना वेळ व श्रमाचा सामना करावा लागतो गेल्या पंधरा वर्षापासून एसटी ची सुविधा मिळत नाही हे दुर्दैव आहे कुडणुर शिंगणापूर या गावातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जत खिळेगाव एसटी या मार्गे चालू झाल्यावर या गावातील नागरिकांची सोय होणार आहे तरी जत एसटी आगाराने तातडीने एसटी बस सेवा सुरु करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी कुडणुर, शिंगणापूरचे विलास सरगर,मारूती पांढरे,अण्णासो खांडेकर, युवराज हाके, अमोल माने, बाळासाहेब माने आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment