मित्राशी गंमतीत लावलेली पैज मृत्यूचे कारण ठरल्याची घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीचा ५0 अंडी खाण्याच्या पैजेपायी मृत्यू झाला. वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे ही घटना घडली आहे.
शुक्रवारी(दि.१) संध्याकाळी सुभाष यादव (४२) नावाचा व्यक्ती अंडी खाण्यासाठी मित्रासोबत बीबीगंज बाजारात गेले होते. अंडी खाताना, कोण किती अंडी खाऊ शकते याबाबत दोघांमध्ये चर्चा सुरू होती आणि गंमती गंमतीत दोघांमध्ये अंडी खाण्यावरून पैज लागली. ५0 अंडी आणि एक बाटली दारू पिण्याची ही पैज जिंकण्यास दोन हजार रुपये देण्याचे ठरले. सुभाषने पैज मान्य केली आणि अंडी खायला सुरुवात केली. त्यांनी ४१ अंडी खाल्ली, पण ४२ अंडे खाताच ते बेशुद्ध झाले. तेथे उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याचे पाहून तेथून सुभाष यांना लखनौच्या रुग्णालयात हलवले. तेथे रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुभाष यांनी याच वर्षी दुसर्यांदा लग्न केले होते. पहिल्या पत्नीपासून चार मुली झाल्यामुळे मुलासाठी त्यांनी नऊ महिन्यांपूर्वीच दुसरा विवाह केला होता. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष यांची दुसरी पत्नी सध्या गर्भवती आहे. परिसरात ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.
No comments:
Post a Comment