Tuesday, November 12, 2019

शिक्षक बँकेच्या नूतन अध्यक्षानी व्याजदर कमी करावा

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातुन शिक्षक बँकेवर निवडून गेलेले संचालक  यांची शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्याने त्यांनी सत्त्तेच्या शेवटी तरी व्याजदर कमी करावा अशी मागणी जत तालुका शिक्षक भारती चे अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी केली आहे  शिक्षक बँक ही  सभासदांची कामधेनु आहे मात्र शिक्षक बॅंकेच्या कारभाराबाबत शिक्षक सभासद समाधानी नाहीत व्याजदर कपातीच्या बाबतीत सत्ताधारी दिशाभूल करत आहेत जणू बॅंकेचा कारभार आपणच पारदर्शी चालवत आहोत असा कांगावा केला जात आहे वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे वार्षिक अहवाल २०१८-१९ नुसार सरासरी ठेवींचा व्याजदर ८.३८% असताना कर्जाचा व्याजदर मात्र १३.५% आहे हे आता लपून राहिलेले नाही .

सध्या जत तालुक्यातील संचालक चेअरमन आहेत आणि शिक्षक बॅंकेत सर्वात जास्त कर्ज जत तालुक्यातील शिक्षक सभासदांचे आहे बॅंकेच्या इतिहासात सर्वात जास्त नफा जतमुळे होतो पर्यायाने सर्व कर्जदार सभासद यांचे आर्थिक नुकसान होत आहे स्पर्धेच्या युगात बॅंकेच्या कारभाराबाबत सुधारणा करण्यात आली पाहिजे सभासद हित डोळ्यासमोर ठेवून कर्जाचा व्याजदर कमी करायला हरकत नाही नाही तर तो कमी करायला हवा असेही सावंत म्हणाले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मल्लया नांदगाव ,नवनाथ संकपाळ, शौकत नदाफ , जितेंद्र बोराडे अविनाश सुतार , बाळासाहेब सोलनकर ,विनोद कांबळे इ पदाधिकारी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment