Saturday, November 2, 2019

पिकांची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी-प्रभाकर जाधव

जत,( प्रतिनिधी)-
 अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी आजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
जत तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून  पडत असलेल्या सत्ततच्या परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. परंतु सदरच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे रब्बीचा पीकांचे देखील मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झालेले आहे. द्राक्ष, डाळिंब व इतर फळबागायत पिकांचे देखील पावसामुळे मोहर गळणे, विविध प्रकारचे रोग निर्माण होणे व इतर कारणांमुळे मोठया प्रमाणात हानी झालेली आहे.

मुख्यमंत्र्यानी नवीन मंत्री मंडळ स्थापन होताच शेतकऱ्यांना सदर पावसाने झाले नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे सदर नुकसानीचे पंचनामे होणे गरजेचे आहे. तरी सदर शेतकऱ्यांचे पावसाने झाले नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकन्यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळणे बाबत शासनाकडे शिफारस करणेत यावी, अशी मागणी श्री. जाधव यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment