डॉक्टरांना 'चिंता'मुक्त करणारी 'काळजी'
जत,(बातमीदार): रुग्णाच्या
जीवनातील धोका टाळून त्याला मृत्यूच्याही दाढेतून परत आणणार्या डॉक्टरांच्या कुटुंबाचीही
काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने पुढाकार घेतला आहे. यामुळे डॉक्टरांनाही
आपल्या कुटुंबाबद्दल असणारी चिंता कमी होण्यास मदत मिळणार आहे. डॉक्टरांसाठी 'केअर
विथ कन्सर्न' ही योजना सुरू करण्यात आली असून याद्वारे डॉक्टरांना मोफत विमा कवच मिळणार
आहे.
एखादा अपघात अथवा मोठय़ा आजारामुळे गंभीर असणार्या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतूनही परत आणण्यासाठी डॉक्टर मंडळी जीवाचे रान करतात व त्या रुग्णाच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळतो. मात्र याच डॉक्टरांवर संकट ओढावले तर त्यांच्या कुटुंबाची काळजी कोणी घ्यावी याची मोठी चिंता असते. यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने पुढाकार घेत डॉक्टरांना मोफत विमा कवच देणारी 'केअर विथ कन्सर्न' ही योजना सुरू केली आहे.
या योजनेसाठी एमबीबीएस, एमएस, एमडी डॉक्टर पात्र ठरतात. यामध्ये जनरल पॅ्रक्टीशनर, स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्ट यांच्यासह वरील पदवीचे शिक्षण घेणारे तरुण डॉक्टरही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पदवी असलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच त्याचे नूतनीकरणही आवश्यक असून दर पाच वर्षाने हे नूतनीकरण करावे लागते. काय आहे 'केअर विथ कन्सर्न' एखाद्या डॉक्टरचा अपघात होऊन त्याचा त्यात मृत्यू झाला तर त्याचे कुटुंबीय उघड्यावर येते. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी या कुटुंबास काही तरी मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने ही योजना सुरू केली आहे. यामध्ये मृत डॉक्टरच्या वारसाला तीन लाख रुपयांची मदत देण्यात येते. विशेष म्हणजे यासाठी अगोदर कोणताही हप्ता (प्रिमीयम) भरावा लागत नाही. पूर्णपणे ही मोफत योजना असून त्यामुळे डॉक्टरांची चिंता कमी होण्यास मदत मिळणार आहे.

बोकडाचे मटण ४०० रुपये किलो
जत,(बातमीदार): मांसाहार
करणारया लोकांना आता महागाईची झाला बसली आहे.
बोकडाचे मटण ४०० रुपये झाले आहे. चिकनचा दर मात्र १८० रुपये असा कायम आहे. गेल्या महिन्यापासून
मटणाचे दर वाढले आहेत.
जत शहरासह चिकनपेक्षा बोकडाच्या मटणाला अधिक मागणी असते. साधारण
आठ-नउ किलोची बोकडाची पिल्ली जतमध्ये कापली जातात. जत तालुक्यातील बोकडाचे मांस चवीला
रुचकर असते. त्यामुळे सांगली, कोल्हापूर या भागातील व्यापार्यांकडून मोठी मागणी असते.
जत आणि माडग्याळ आठवडी बाजारात बोकडांचा मोठा
बाजार भरत असतो. लाखोची उलाढाल या बाजारांमध्ये होत असते. दुष्काली परीस्थीती असल्यामुळे बोकडांचा तुटवडा
जाणवत आहे. महागाईदेखील वाढल्याने इथल्या मटण दुकानादारानी मटणाचे भाव वाढवले आहेत.
No comments:
Post a Comment