पहाटे
थंडी; दुपारी कडाका
जत,(बातमीदार); गेल्या आठवड्याभरापासून शहरासह तालुक्यात तीन अंशाने वाढलेले आणि रात्रीच्यावेळी एक अंशाने
कमी झालेल्या तापमानामुळे दिवसा उन्हाळा, तर पहाटे हिवाळा असे दोन ऋतू अनुभवायला मिळत
आहेत. सध्या दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि पहाटेच्या वेळी थंडीचा कडाका असे परस्पर
विरोधी चक्र जाणवू लागले आहेत. येत्या दोन दिवसात तापमानाची स्थिती अशीच राहणार असल्याचा
अंदाज हवामान खात्यामार्ङ्गत वर्तविण्यात आला आहे. राज्यात काल सर्वात कमी तापमान जळगाव
येथे 11.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या
खाली उतरल्यामुळे तापमानात घट झाली आहे. तर, दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे
तङ्गावत वाढली आहे. किमान तापमानात 1.2 अंश सेल्सिअने घट झाली असून, 11.9 अंश सेल्सिअस
इकते किमान तापमान नोंदले गेले. त्यामुळे शहरात रात्री दहा वाजल्यानंतर गारठा जाणवत
होता. कमाल तापमानाचा पारा 3.1 ने वाढून 31.1 अंश सेल्सिअसपर्यंत पोचला आहे. पुढील
चोवीस तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याने कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत
राहण्याची शक्यता आहे.
सक्तीमुळे हेल्मेटच्या भावात वाढ
जत,(बातमीदार); हेल्मेटसक्ती करण्यात आल्याने एरवी 300 ते 400 रुपयांना मिळणारे आयएसआय मार्क
असलेले हेल्मेट सध्या 500 ते 600 रुपयांना विकले जात आहे. त्यामुळे हेल्मेट उत्पादन
कंपन्यांना चांगले दिवस आले आहेत. या सक्तीचा ङ्गायदा घेत विक्रेत्यांनी किंमतीत
200 ते 400 रुपयांची वाढ केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हेल्मेटच्या दरात वाढ झाली
आहे. मागणी वाढल्याने विक्रेत्यांनी हेल्मेटच्या किंमतीही वाढविल्या आहेत. 800 रुपयांचे
हेल्मेट दुकानदार 1000 ते 1200 रुपयांनी विकत आहेत. तर 2 हजार रुपयांच्या हेल्मेटची
किंमत 2200 ते 2400 पर्यंत पोचले आहेत.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाला स्थगिती
जत,(बातमीदार): बहुचर्चित आणि महाराष्ट्राचे वेगळेपण
राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवणारे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान गुंडाळण्याच्या
मार्गावर आहे. स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी महाराष्ट्राला दिलेल्या या अनोख्या अभियानाने
संपूर्ण ग्रामीण परिसराला स्वच्छतेच्या प्रोत्साहित केले होते. सरकारने नुकताच एक आदेश
सर्वच जिल्हा परिषदांना धाडला असून त्यामध्ये या अभियानाची 2014-15 आणि 2015-16 अंमल-
बजावणी प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेशपत्र जारी केले आहे. राज्य सरकारच्या पाणीपुरवठा
व स्वच्छता विभाग मंत्रालयाच्या वतीने शनिवारी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या
मुख्य कार्यकारी अधिकार्यांना आदेशपत्र धाडले आहे. या आदेशाची अंमलबजावणी पत्र दिल्याच्या
दिनांकापासून होत असल्याचेही उपसचिव रुचेश जयवेशी यांनी आदेशात स्पष्टपणे नमूद केले
आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत 2014-15 मधील जिल्हा व विभागीय स्तरावरील
तपासणी अद्याप बाकी आहे. त्याबरोबरच या अगोदर दिलेल्या पत्रानुसार या अभियानाची
2015-16 ची अंमलबजावणी प्रकिया सरकारच्या निर्णयानुसार करण्याचे आदेश देण्यात आले होते.
2014-15 मधील अंमलबजावणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याबाबतही कळविण्यात आले होते.
परंतु अद्यापही ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा 2015-16 मधील
अंमलबजावणी प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अभियानाची 14-15 आणि
15-16 या दोन्ही वषार्र्ंतील अंमलबजावणी प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. दोन्ही
वर्षांतील स्वच्छता अभियानातील अंमलबजावणीला स्थागिती देताना सरकारने त्याच्या पुढे
या अभियानाचे काय करायचे आहे, याबाबतचा कोणताही उल्लेख केला नसल्याने हे अभियान गुंडाळण्यात
येण्याची दाट शक्यता आहे.
शासनाकडे इतरांना द्यायला पैसा आहे, पण आवर्तानासाठी
नाही: पाटील
सांगली: कोल्हापूरचा टोल रद्द केला. नृसिंहवाडी
येथील कन्यागत महापर्वासाठी एकशेएकवीस कोटींचा निधी दिलाय, व्यापार्यांचा एलबीटी रद्द
केलाय, नाशिकच्या कुंभमेळ्याला तेवीसशे कोटी रुपये दिलेत. अशा सर्व ठिकाणच्या तरतुदींसाठी
सरकारकडे पैसे आहेत आणि दुष्काळात होरपळणार्या शेतकर्यांना ’म्हैसाळ’चे एक आवर्तन
द्यायला पैसे नाहीत काय, असा सवाल करत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी
सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून तरी अशी
अपेक्षा नव्हती, असेही ते म्हणाले. म्हैसाळ योजनेवरील पाण्याचा लाभ घेणारा शेतकरी अजिबात
पैसे भरत नाही, असे नाही. आजवर तो पैसे भरतच आलाय. अडचणीच्या काळात सरकारने एखाद-दुसर्या
आवर्तनाचे वीज बिल ’टंचाई’तून भरले असेल, असे स्पष्ट करून प्रतीक पाटील म्हणाले, म्हैसाळ
योजना अद्यापही अपूर्ण असल्याने त्याची जबाबदारी सरकारचीच आहे. मध्यंतरी जत तालुक्याला
पाणी दिले. त्या भागातील तलाव भरून घेतले. त्या पाण्याचे पूजन करायला खासदारांसह अनेकजण
धावले. सांगोल्याला पाणी दिले. त्याचे बिल कोण देणार? तेपण बिल याच शेतकर्यांनी भरायचे
काय? किमान त्या पाण्याचे पैसे तरी भरा. त्या पैशांमुळेच बिलाचा ङ्गुगवटा आहे. तो कमी
करा. बिलाच्या खर्या रकमा पुढे आणा. आमचे शेतकरी स्वतःहून पैसे भरायला तयार आहेत.
शेतकर्यांच्या सात-बारावर बोजा नोंदविला आहे. त्यामुळे त्यांना कर्ज तरी कोण देणार
? बिलाच्या अडचणी का निर्माण झाल्या आहेत, याची पडताळणी केल्यानंतर नेमके वास्तव समोर
येईल. जनतेच्या करातून जमा झालेली रक्कमच सरकार वाटत असल्याने सरकारने सर्वांना समान
न्याय दिला पाहिजे. कॉंग्रेसने पैसे भरावेत, असे म्हणणार्या भाजपला आम्ही सत्तेत असताना
पैसे भरण्यास सांगितले होते काय, असा चिमटा घेऊन पाटील म्हणाले, योजनांच्या पाणी बिलांसाठी
चार-दोन साखर कारखान्यांकडे बोट दाखविण्यापेक्षा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या
माध्यमातून देण्यात येणार्या पीककर्जात एकरी 1900 रुपये अधिक दिले, तर पाणी बिल आपोआप
वसूल होणे सहज शक्य आहे.
कृषिपंपधारकांना वीज बिलात सवलत
जत,(बातमीदार): महाराष्ट्रातील कृषिपंपधारकांच्या
(सहकारी पाणी पुरवठा संस्था) जून 2015 पासून ’महावितरण’ने 44 पैसे/युनिटची दरवाढ केली
होती. ही दरवाढ शेतकर्यांना परवडणारी नसल्याने महाराष्ट्र राज्य इरिगेशन ङ्गेडरेशनचे
अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील व आमदार बाळासाहेब पाटील (कराड) यांनी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री
यांना दरवाढ रद्द करणेबाबत पत्र दिले होते. या पत्रानुसार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी मंत्रालयात वाढीव वीज बिलाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. ऊर्जा-
मंत्र्यांनी राज्यातील ’महावितरण’ची सर्व आर्थिक परिस्थिती नमूद केली. मुख्यमंत्री
व वित्तमंत्र्यांनी जादा सवलत देण्याचे मान्य केले. पदाधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांना
भेटण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयातून नुकतीच सह्याद्रि अतिथीगृहात
कृषिपंपाच्या जून 2015 च्या वाढीव दराबाबत सविस्तर चर्चा झाली. महावितरणची आर्थिक दुर्बलता
व दुष्काळी परिस्थितीचा विचार करून 44 पैसे प्रतियुनिटपैकी राज्य शासन 24 पैसे प्रतियुनिट
सवलत देईल. कृषिपंपधारकांनी 20 पैसे / प्रतियुनिट दराची रक्कम वाढीव दराने भरून ‘महावितरण’ला
व राज्य शासनास सहकार्य करावे, असा निर्णय मुख्यमंत्री ङ्गडणवीस यांनी जाहीर केला.
मल्लेशाप्पा कांबळे यांची निवड
जत,(बातमीदार): महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक
संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मल्लेशाप्पा कांबळे यांची, तर जिल्हा संघटकपदी दिलीप
वाघमारे यांची निवड करण्यात आली. पंढरपूर येथे आयोजित विभागीय मेळाव्यात राज्याचे अध्यक्ष
शामराव जवताळ यांनी ही निवड केली. यावेळी राज्याचे कार्याध्यक्ष एस. बी. लोंढे, राज्य
सहसचिव शशिकांत खुडे, उपाध्यक्ष एन. पी. निकंबे, सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष काटे,
तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत, प्रल्हाद हुबाळे, विद्याधर भालशंकर उपस्थित होते. नूतन
सदस्यांचा सत्कार जिल्हा अध्यक्षांनी केला. या निवडीनंतर बोलताना ते म्हणाले, जत तालुक्याबरोबर
संपूर्ण सांगली जिल्ह्यात मागासवर्गीय शिक्षक संघटना उभी करून प्राथमिक शिक्षकांचे
प्रश्न सोडविण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शिक्षकांची
संख्या कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत घट होत आहे. यासाठी जिल्हा मागासवर्गीय
शिक्षक संघटनेच्यावतीने आम्ही पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या समोर गार्हाणी मांडू,
अशी ग्वाही दिली
गुड्डापूर
येथे विक्रम सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप
माडग्याळ,(वार्ताहर): विक्रम सावंत यांच्या वाढदिवसा-
निमित्त गुड्डापूर येथे वह्या वाटप कार्यक्रम विक्रमदादा सावंत युवा मंचचे अध्यक्ष
गनी मुल्ला यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी सरपंच मेहबुब मुल्ला, ग्रामपंचायत
सदस्य खंडू गाडवे, आदम मुल्ला, संजय सर्जे, रियाज मुल्ला, सुखदेव सोलनकर, दत्ता चौगुले,
धनेश्वर पुजारी उपस्थित होते. गनी मुल्ला म्हणाले, तालुक्यातील विक्रम सावंत व कॉंग्रेस
कार्यकर्त्यांनी यंदाच्या दुष्काळात जनतेला दिलासा देण्याचे काम केले पाहिजे. यासाठी
तरुणांनी पुढाकर घ्यायला पाहिजे. विक्रमदादा ङ्गौंडेशन च्या वतीने दुष्काळासंदर्भात
आवाज उठवून शासनाला जागे करू. शासनाने दुष्काळी जनतेचा अंत न पाहता तातडीने चारा छावण्या
किंवा डेपो चालू करावा, अशी मागणी युवा मंच गुड्डापूर यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी
युवामंचाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment