जत,(प्रतिनिधी)-
अंगणवाडी
व शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवून देणार्या स्वयंपाकी,
मदतनीस, बचत गटांचे मानधन, इंधन खर्च गत सात महिन्यांपासून मिळाला नाही. तालुक्यातील
स्वयंपाकी व मदतनिसांना या मानधनाची प्रतीक्षा असून उधारी-उसनवारी
आता संपुष्टात आली आहे.
जिल्हा
परिषदेच्या शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण आहार शिजवून देण्याची जबाबदारी स्वयंपाकी,
मदतनीस, कामगार व बचत गटाच्या महिलांनी स्वीकारली
आहे. या मोबदल्यात शासनाकडून मानधन व भाजीपाला, बिस्किट, इंधन खर्च दिला जातो. गत काही सात महिन्यांपासून स्वयंपाकी व मदतनीस यांना मानधन व अन्य खर्च मिळालेला
नाही. त्यामुळे या मानधनाअभावी विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत.
आतापर्यंत ऊसनवारीवर इंधन खर्चाचा भार पेलला आहे. यापुढे ऊसनवारीचे व्यवहारही संपुष्टात येत असल्याने पोषण आहार शिजवावा कसा?
असा प्रश्न स्वयंपाकी व मदतनिस संघटनेने उपस्थित
केला आहे.
No comments:
Post a Comment