किराणा दुकानातून विक्री होत राहिल्यास कारवाई
माडग्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
उमदीत हातभट्टी दारू बनविण्यासाठी गुळाचा वापर केला जात असल्याने उमदी पोलिसांनी गूळ खरेदी-विक्री वर बंदी घालण्यात आली आहे. उमदी येथील किराणा दुकानदार केवळ नफा न पाहता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या व ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. असे असताना कांहीं दुकानदारांनी गुळ स्टॉक करून हातभट्टी दारू तयार करण्याऱ्या कांही जमातींना देत आहेत. सध्या सरकारी दारू दुकाने बंद असल्याने गावातील कांही लोक हातभट्टीकडे वळले आहेत त्यातच कर्नाटक राज्यातील चडचण, देवरनिंबर्गी, हिंचगिरी, निवर्गी आदी भागातील लोक दारू पिण्यास उमदीत येत आहेत.
यात गंभीर्याची गोष्ट म्हणजे कर्नाटकातील निवर्गी गावात कोरोनाच्या पॉझिटिव्ह केसेस आहेत त्या गावातून उमदी गावात दारू पिण्यासाठी लोक येत असतात. दारू उत्पादन करणारे उमदीतील किराणा दुकानातून गुळ घेत असतात त्यामुळे धोका होण्याची दाट शक्यता आहे. गुळ नसले की कुणी मरत नाहीत. रोजच्या घरच्या स्वयंपाकात गुळाची तितक्याच आवश्यकता वाटत नाही, त्यामुळे दुकानदार गुळ खरेदी-विक्री करणे बंद केले तर फार घात होणार नाही. पण गुळ आणि युरिया शिवाय दारू बनवता येत नाही आणि दारू बंद तर बाहेर गावचे कुणी येणार नाहीत. म्हणून गुळ विक्री कोरोना हटू पर्यत बंद करणे योग्य होणार आहे याच पार्श्वभूमीवर उमदीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व पोलिस निरीक्षक नामदेव दांडगे , सरपंच निवृत्ती शिंदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन उमदीतील किराणा दुकानदारांनी गुळाबरोबर तंबाखू, गुटका, बिडी, सिगरेटखरेदी- विक्री करू नयेत असा सक्त सूचना दिली आहे जर सूचनांचे पालन न करणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment