Thursday, April 9, 2020

मन करारे प्रसन्न , सर्व सिद्धीचे कारण

सध्याच्या तणावाच्या काळात मनोधैर्य टिकविण्याची गरज आहे . त्यासाठी पुन्हा संतांकडेच जावे लागते . संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे ' मन करा रे प्रसन्न , सर्वसिद्धीचे कारण हे लक्षात ठेवले पाहिजे . आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे . समाजाचे आपण जबाबदार घटक आहोत , हे लक्षात घेऊन प्रत्येकाने सध्याच्या काळात मन प्रसन्न ठेवावे . आपल्या प्रत्येक कृतीमागे अर्थ आहे . ' मस्तकस्य हस्तदय स्पर्शनम् म्हणजे दोन्ही हात जोडून छातीजवळ घ्यायचे व त्यावर मस्तक ठेवून समोरच्याला नमस्कार करायचा , असे सांगितले आहे .
यामध्ये पाहा , तुमचा उच्चावास हा समोरच्याकडे जात नाही . केवढे मोठे शास्त्र यामागे दडले आहे . हेच आज सांगितले जात आहे . आपण देवपूजा करतानाही , असे अंतर ठेवले जाते की , उच्छवास देवाकडे जात नाही . आज याचेच आचरण करायला सांगितले जात आहे . त्यामुळे पूर्वजांनी जे काही सांगितले . ते खूप अर्थपूर्ण आहे . त्यांच्या प्रत्येक सांगण्यामध्ये काही ना काही अर्थ दडलेला आहे . एवढेच नव्हे , तर ती कृती तशीच का करायची , यामागे शास्त्रही आहे . आपण मात्र त्याचा विचार करत नाही . तो आता करावा . सरकारही तेच सांगत आहे .
धमनि नेहमीच मानवजातीचे कल्याण चिंतले आहे . लाखो वर्षाच्या निरीक्षणातून धर्माचे लिखाण झाले आहे . त्यामुळे धर्म काय सांगतो , हे लक्षात न घेता धर्माची टिंगलटवाळी करणे योग्य नाही . प्रत्येकाने शुद्ध आचरण करावे . मनुष्य स्वभाव वेगळा आहे . जे काही करायचे ते पूर्ण करायला हवे . याचे उदाहरणच द्यायचे झाले , तर आपण तब्येत बिघडल्यावर उपचारासाठी डॉक्टरांकडे जातो . डॉक्टर निदान करून रोग पूर्ण बरा होण्यासाठी काही औषधे देतात . आपण ती घेतो . काही दिवसांनी थोडे बरे वाटल्यावर औषध घेण्याचे आपण बंद करतो . तसे केले , तर रोग पूर्ण बरा होत नाही . तसेच वागण्याचेही आहे . प्रसंगानुरूप चांगले वागण्यापेक्षा कायमपणे शुद्ध आचरण ठेवणे महत्वाचे आहे . आपण घर जसे स्वच्छ ठेवतो , तसाच आपला परिसरही स्वच्छ कसा राहील , याकडे कटाक्ष ठेवला पाहिजे , ते कोणी सांगण्याची गरज भासू नये , आज हे सांगावे लागते ते योग्य नाही . आपण यातून चांगले शिकले पाहिजे .
आचरण शुद्ध हवे . आपली वर्तणूक ही संपूर्ण समाजाला उपकारक अशी असली पाहिजे . समाज पुढे जाईल समाजाला उपयोगी ठरेल , असे आपले वर्तन कायमपणाने असले पाहिजे . धमनि तेच सांगितले आहे . त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे , शुद्ध आचरणातून आणि समाजोपयोगी वर्तणुकीतून आपण केवळ स्वतःचीच नव्हे , तर संपूर्ण समाजाची आणि या माध्यमातून राष्ट्राची । प्रगती साधत असतो . -करवीरपीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती (सौजन्य- दैनिक पुढारी)

No comments:

Post a Comment