Monday, April 13, 2020

(क्राइम स्टोरी) ऐश्वर्याने तिच्या नवऱ्याला का मारले?

नरेशचा मृतदेह 2 दिवसानंतर एका विहिरीत सापडला.  दुर्गंधी पसरला होता, त्यानंतरच लोकांना कळले की विहिरीत एक मृत शरीर आहे.  त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.  नरेशची पत्नी ऐश्वर्या हिने आपला नवरा बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत केली केली होती.  नरेश हा शहरातील एक प्रसिद्ध उद्योजक होता.  वडिलांच्या मृत्यूनंतर तो संपूर्ण व्यवसाय हाताळत होता, त्या मुळे तो खूप व्यस्त होता.  सकाळीदहा वाजता  घराबाहेर पडला की, रात्री दहा नंतरच घरी  परतायचा.

नरेशची पत्नी ऐश्वर्या कुटुंबीयांना पसंद नव्हती, म्हणून तो तिला घेऊन शहरातील सर्वात महागड्या अशा भागात फ्लॅट घेऊन राहात होता.  ऐश्वर्या खूप सुंदर होती.  लग्नानंतर वर्षाभरातच ही घटना घडली. मृतदेह सापडल्यानंतर पोलिस ऐश्वर्याकडे चौकशी करण्यासाठी आले, "तुम्हाला कोणावर संशय आहे का?" असा पहिला प्रश्न पोलिसांनी केला.

 "नाही," ऐश्वर्या तोंडाला पदर लावत म्हणाली.

 "बिझनेसवरून त्यांचा कुणाशी वाद होता का?"

 "ते घरात बिझिनेसविषयी काहीच बोलत नव्हते."

 पोलिसांनी चौकशीदरम्यान ऐश्वर्याने जे सांगितले त्यानुसार नरेशचा बनारसी साड्यांचा मोठा व्यवसाय होता.  कामाच्या व्यापामुळे,  त्याची लोकांशी  क्वचितच कधी भेट होत होती.  कारण त्याच्याकडे कधीच वेळ नव्हता.  या फ्लॅटमध्ये त्याने जास्त वेळ घालवला नाही.  गार्डच्या म्हणण्यानुसार तो एक सभ्य मनुष्य होता.  गार्डला नरेशबद्दल यापेक्षा जास्त काही सांगता आले नाही.  नरेश हा एक मोठा उद्योगपती होता, त्यामुळे नरेशचे मारेकरी पकडण्यासाठी शहरातील व्यावसायिकांचा पोलिसांवर प्रचंड दबाव होता.  ते वारंवार आंदोलन करण्याची  धमकी देत होते.  पोलिसही मारेकरीपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होते.  नरेशचे कोणत्याही व्यावसायिकाशी वैर नव्हते, कारण त्याच्या कर्मचार्‍यांची चौकशी केली गेली होती. ते सर्व म्हणाले की ,त्यांनी आपल्या बॉसला पैशासाठी कोणाशी कधी भांडताना पाहिले नाही.  आश्चर्याची बाब म्हणजे घरातील कुणीच लोक पोलिसांशी बोलायला तयार नव्हते.  कदाचित त्याचे कारण नरेशच्या कुटुंबातील सदस्यांचा त्याच्यावर राग होता.
पोलिसांनी नाराजीचे कारण विचारले असता लोकांनी सांगितले की नरेशने प्रेम केले आहे, त्यामुळे घरातील लोक संतापले.  पोलिसांना वाटले की अशा गोष्टींसाठी कोणीही आपल्या रक्तातल्या माणसाला मारू शकत नाही.  या व्यतिरिक्त नरेश हा एक अशा उद्योग क्षेत्रातला होता, जो प्रामाणिक उद्योगपती होता. अशा माणसाचा खून कोण करेल?
पोलिसांनी नरेशच्या सर्व क्रमांकाची कॉल डिटेल काढून त्यांची चौकशी केली.  त्यांच्यात संशयास्पद असे काहीही आढळले नाही.  त्यामुळे संशयाची सुई ऐश्वर्यावर येत  होती.  नरेशच्या घरातील कोणताही सदस्य या प्रेमविवाहामुळे खुश नव्हता.  असे असूनही नरेश भावांबरोबर व्यवसाय करत होता.  प्रत्येकजण पूर्वीप्रमाणेच एकत्र व्यवसाय करत होते.  नरेशसुद्धा आईला भेटायला घरी जात येत असे.
 जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांनाही यांच्याबद्दल फारसे काही माहिती नव्हते. नरेश जिथे राहत होता,तो एरिया  पॉश लोकांचा होता. इथे शेजारी काय चालले आहे,यांच्याशी कुणाला काहीच देणे-घेणे नसते.फ्लॅट्सही असे बनविले जातात की जे  घडत आहे ते जवळच्यांना देखील माहित नसते.  इथेही अशीच परिस्थिती होती. फक्त एक गार्ड होता. या इमारतीत कोण कधी येतं, कोण कधी जात याची त्याला कल्पना असते. पण त्याने तशी नोंद ठेवायला हवी. सगळी चौकशी झाल्यावर पोलिस गार्डपर्यंत पोचले.
या प्रकरणाचा तपास करणारे इन्स्पेक्टर जाधव यांनी विचारले की, "तू प्रत्येक गेस्टचा रेकॉर्ड ठेवतोस का?"

 "नाही सर, इथे अशी कोणतीही व्यवस्था नाही.  बाहेरून आलेल्या माणसाला ज्याला भेटायचं आहे,त्याला फोन करून विचारतो. त्यांनी पाठवून द्या म्हटले की, पाठवतो. " गार्ड सहजपणे म्हणाला.

 "ऐश्वर्या मॅडमला भेटायला कोणी आले होते का?"

 "सर, कुणी ना कुणी  कुणाला तरी भेटायला येतच असतं.  मी कोणाबद्दल काय सांगू शकतो? "

 "जर कोणी एकापेक्षा जास्त वेळा एकाद्याला भेटायला आला असेल तर तू त्याला ओळखू शकतोस का?"

 "हो सर, ओळखू शकतो" गार्ड म्हणाला.

 यानंतर इंस्पेक्टर जाधव पुन्हा ऐश्वर्याच्या फ्लॅटवर परत आले.  तिला पुन्हा एकदा विचारले, "मॅडम, जरा आठवा,असा कोणी आहे का जो तुमच्या पतीचा वैमनस्य बाळगू शकेल?"

 "किती वेळा तुम्ही तेच तेच विचारताय?  मी तुम्हाला  सांगितले ना की मला काहीच माहित नाही. " ऐश्वर्या थोड्या रागणेच म्हणाली.  इन्सपेक्टर जाधव यांनी इकडे-तिकडे पाहत विचारले, "तुम्ही इथे एकटेच राहता का?"

 "का?" ऐश्वर्याने थोडे विचलित होऊन विचारले.

 "मला म्हणायचे आहे की या संकटाच्या काळात कोणीतरी तुमच्याजवळ असायला हवं."

 "माझी अम्मी आली आहे."

 "अम्मी?" इंस्पेक्टर जाधव यांनी आश्चर्याने विचारले.

 "हो, मी तिला अम्मी म्हणते". ऐश्वर्या म्हणाली.

 दरम्यान, इंस्पेक्टर जाधव तिच्या चेहऱ्यावरचे  भाव वाचत राहिले.  त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, "मी त्यांना भेटू शकतो का?"

 "तो आता घरी नाही."

 "त्या कुठे गेल्या आहेत?"

 "ती बाजारातून काही वस्तू आणायला  गेली आहे."

 "त्या परत कधी येतील?"

 "दीड ते दोन तास लागू शकतात." ऐश्वर्याने सांगितले.

 "हरकत नाही, मी परत आलो की त्यांना भेटेन."  तुम्ही तपासात सहकार्य करत रहा, एक दिवस नक्कीच खुनी पकडला जाईल. '' इन्स्पेक्टर जाधव उठून म्हणाले.  ते दारात पोहोचताच तोच आतून एका बाईचा खोकण्याचा आवाज आला. ते मागे वळून म्हणाले, "तुम्ही म्हणत होता की आत कोणीच नाही, मग हा खोकला कोणाचा आहे?"

 "मी असं कुठे म्हटलं की, घरात कुणीच नाही. सासूबाईही आल्या आहेत. "ऐश्वर्या म्हणाली.

 इंस्पेक्टर जाधव काहीही न बोलता बाहेर आले. जिन्याच्या पायऱ्या उतरताना इन्स्पेक्टर जाधव विचार करत होते, नरेशच्या घरच्यांना विचारल्यावर त्यांनी व्यवसाय सोडला तर त्याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही, असे सांगितले होते. मग नरेशची आई इथे का जखमेवर मीठ चोळायला आली आहे.
इन्स्पेक्टर जाधव यांनी पोलिस ठाण्यात येऊन या प्रकरणाचा सखोल विचार करायला सुरुवात केली.  त्यांना एक कळले की, की ऐश्वर्याने आईला अम्मी का म्हटले. म्हणजे ती मुस्लिम आहे.  त्यामुळेच कदाचित,  नरेशचे कुटुंब ऐश्वर्याला पसंद करत नाही?
 कुटुंबातील सदस्यांना याबद्दल विचारण्याचे ठरवून त्यांनी इतर कामे करण्यास सुरवात केली.  दुसर्‍या दिवशी ऐश्वर्याचा फोन आला.  ती जरा चिंताग्रस्त होती.  ती घाबऱ्या आवाजात म्हणाली, "इन्स्पेक्टर साहेब, लवकर या."  मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. "

 इन्स्पेक्टर जाधव तातडीने ऐश्वर्याच्या घरी पोहोचले.  त्यांना कागदाचा तुकडा देऊन ती म्हणाली, "बघा, यात काय लिहिले आहे?"

 इन्स्पेक्टर जाधव यांनी ती चिठ्ठी उघडली.  त्यात लिहिले होते की, '26 फेब्रुवारी पर्यंत 10 लाख रुपये द्या, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील.'

 "तुम्हाला ही चिठ्ठी कुठे मिळाली?" इंस्पेक्टर जाधव यांनी विचारले.

 "बेडच्या गादीखाली."

 नरेशची 27 फेब्रुवारी रोजी हत्या झाली होती.  साहजिकच, कोणीतरी खंडणी मागितली होती आणि   नरेशने पैसे दिले नाहीत म्हणून त्याचा खून केला असावा. पण कोणाला पैसे द्यायचे होते, कुठे द्यायचे होते ,याचा शोध लावणे कठीण होते. कारण कॉल डिटेलमध्ये असा कोणताही नंबर सापडला नव्हता, ज्यामुळे अशाप्रकारे पैसेमागीतल्याचा संशय आला यावा.  इन्स्पेक्टर जाधव यांनी विचारले, "नरेशची तुमच्याशी याबद्दल काही चर्चा झाली का?"

 "नाही". ऐश्वर्याने थोडक्यात उत्तर दिलं.

 "असं कसं घडू शकेल, तुम्ही त्यांच्या पत्नी आहात.  अशा परिस्थितीत नवरा आपल्या बायकोला काही ना काही सांगतो. "

 "कदाचित ते मला त्रास देऊ इच्छित नव्हते."

 निरीक्षक जाधव यांनी कागदाचा तुकडा आपल्या खिशात घालून   बाहेर आले. त्यांना  गार्डची आठवण झाली.  ते संरक्षक खोलीत पोहोचले,पण त्याना तो कोठेच दिसला नाही.  त्याच्या जागी दुसरा गार्ड आला.  त्यांनी त्याला विचारले, “येथे दुसरा गार्ड होता, तो कोठे गेला?”

 "सर, तो गावी गेला."
 "तो आता परत कधी येईल?" इन्स्पेक्टर जाधव यांनी विचारले.

 "सर, इथले अध्यक्षच तुम्हाला सांगू शकतील."

 "मला त्याचा नाव,पत्ता मिळेल का?"

 "सर, मी याबद्दल काही बोलू शकत नाही.  मी इथे नवा नवाचं  आलो आहे.  आपणास हवे असल्यास तुम्ही चेअरमन साहेबांना विचारू शकता. "

 योगायोगाने चेअरमनची गाडी आत शिरली.  गार्डने इशारा केला तेव्हा सोबतच्या पोलीस शिपायाने गाडी थांबविली.  चेअरमन गाडीतून बाहेर येताच इन्स्पेक्टर जाधव त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, "मला जुन्या गार्डबद्दल जाणून घ्यायचे आहे."  त्याचा नाव ,पत्ता मिळेल का? "

 कोणतीही आडपडदा न ठेवता चेअरमनने इन्स्पेक्टर जाधवांना  सर्व सांगितले.  हे लक्षात आले की गार्डने आपली नोकरी सोडली आहे.  ते परत पोलिस ठाण्यात परतले.  गार्डने अशाप्रकारे अचानक नोकरी सोडली आहे म्हणजे त्याला ऐश्वर्याबद्दल नक्कीच काही तरी माहिती आहे.  गार्डने  नोकरी सोडल्याने आता त्यांना चौकशी करण्यासाठी त्याच्या घरी जावे लागणार होते.  तरीही, ते त्याच्या येण्याची वाट पाहू लागले.
 दरम्यान, त्यांनी अंधारात तीर मारण्याचे ठरवले  एके दिवशी त्याने नरेशच्या मोठ्या भावाला बोलावून विचारले, " पैशाच्या कारणावरून तुमच्यात आणि नरेशमध्ये भांडण चालू आहे काय?"

 "प्रश्नच उद्भवत नाही.  रुखसानाने तुम्हाला ही गोष्ट सांगितली का? "

 "ही रुखसाना कोण आहे?" इन्स्पेक्टर जाधव यांनी आश्चर्याने विचारले.

 "तिचे नाव घेऊन मला माझी जीभ खराब करायची नाही."

 "दोस्ता, तू अगोदरच नाव घेतलंस आहेस, मग आता  मला सांग ही रुखसाना कोण आहे?  कदाचित, नरेशच्या मारेकऱ्यांनापर्यंत पोहोचण्याचा तो मार्ग आहे. "

 काही विचार केल्यावर मोठा भाऊ म्हणाला, "रुखसाना हे नरेशया पत्नीचे नाव आहे."

 "तुम्ही ऐश्वर्या बद्दल बोलत आहात का?"

 "हो, मी तिच्याबद्दलच बोलत आहे."

 नरेशच्या मोठ्या भावाच्या खुलासावरून हे स्पष्ट झाले की रुखसाना म्हणजेच ऐश्वर्या आहे.  इंस्पेक्टर जाधव यांना समजले की या कारणामुळेच नरेशला वेगळ्या घरात राहावे लागले.  कुटुंबातील सदस्यांचे सौजन्य म्हणायचे की त्यांनी नरेशला व्यवसायातून वेगळे केले नव्हते.

 ऐश्वर्याबद्दल खरी माहिती समजल्यावर इंस्पेक्टर जाधव यांनाही तिच्याविषयीचसंशय आला.  त्यांना त्याचा आधीपासूनच संशय आला.  आता त्यांनी आपला तपास तिच्यावर केंद्रित केला.  नरेश रात्री उशिरा घरी परत जायचा.  दरम्यानच्या काळात, ती लोकांना भेटायची, कुणा कुणाला भेटायची?  कुठे भेटायची, हे आता शोधणे आवश्यक होते.  ही सर्व माहिती केवळ गार्डकडूनच मिळू शकणार आहे.  पण तो अजून आला नव्हता.  याचा अर्थ असा की तो आता येणार नाही.

 इन्स्पेक्टर जाधव यांनी चेअरमनने दिलेल्या पत्त्यावर जाण्याचा विचार केला.  तो बिहारच्या सीवान जिल्ह्यातील रहिवासी होता.  स्थानिक पोलिसांच्या मदतीने इन्स्पेक्टर जाधव त्याच्या घरी पोहोचले.  तिथे त्याच्या पत्नीने सांगितले की, तो मुंबईला गेला आहे.  इन्स्पेक्टर जाधव यांनी पुण्याची नोकरी का सोडली हे विचारले तेव्हा त्याच्या पत्नीने सांगितले की तेथे काहीतरी भांडण  झाले आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होता.

 इन्स्पेक्टर जाधव चकित झाले. त्यांची खात्री झाली की, गार्डला या केसबाबत काहीतरी माहिती आहे. म्हणूनच त्याला धमकी देण्यात आली आहे. किंवा तो स्वतः या खुनात सामील असावा.  जाधव यांनी वेळ न दवडता विमान पकडले आणि  थेट मुंबईला गेले.  गार्डचा मुंबईचा पत्ता पत्नीकडे मिळाला होता.

 योगायोगाने त्याच पत्त्यावर गार्ड सापडला.  इंस्पेक्टर जाधवला पाहताच त्याचा चेहरा पांढराफट पडला.  तो म्हणाला, “सर मला काहीच माहित नाही.  मी माझ्या जीवाला घाबरून नोकरी सोडली.  कारण एका साहेबाने मला 50 हजार रुपये दिले होते आणि मला ती नोकरी कायमची सोडण्याची सूचना केली.  नोकरी सोडली नाही तर नाही तर  जीवे मारण्याची धमकी दिली. "

 "त्या माणसाला ओळखतोस?" इंस्पेक्टर जाधवांनी विचारले, सुरुवातीला गार्ड फक्त रडतच राहिला.  पण जेव्हा इन्स्पेक्टर जाधव यांनी त्याला तुरूंगात पाठवण्याची धमकी दिली तेव्हा तो विनवणी करु लागला, "सर, आधी तुम्ही मला खात्री द्या की मला काही होणार नाही."

 “विश्वास ठेव, जर तू या प्रकरणात काही केले नसशील तर तुझे काहीही होणार नाही.” इंस्पेक्टर जाधव यांनी आश्वासन दिले.

 "सर, त्या माणसाचे नाव सलीम आहे."

 "हा सलीम कोण आहे?"

 "सर, संध्याकाळी ते नेहमीच गाडीने येत असे.  तो रात्रभर नरेश साहेबांच्या फ्लॅटमध्ये राहत असे आणि पहाटे निघून जात असे.  ही गोष्ट लपवून ठेवण्यासाठी तो मला टिप देत असे. "

 इन्स्पेक्टर जाधव चकित झाले.  नरेशशी त्याचा काय संबंध होता? बायको घरी असताना सलीम कसा नरेशच्या घरी रात्रभर राहायचा? एकादा माणूस अनोळखी माणसाला  रात्रभर आपल्या फ्लॅटमध्ये कसा राहोई देईल?  इनस्प जाधवांना काहीच कळेना. ही गोष्ट समजली नाही, पण एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की सलीम आणि नरेश यांच्यात काही वाद झाला असावा. कदाचित पैसे किंवा ऐश्वर्याचे सौंदर्य.
आता सलीमचा शोध घेण्याचे आव्हान इन्स्पेक्टर जाधवसमोर होते.  इंस्पेक्टर जाधव गार्डला सोबत घेऊन पुण्याला आले.  बराच विचार करून, त्यांनी एक युक्ती योजली..  ते थेट ऐश्वर्याच्या फ्लॅटवर पोहोचले आणि मारेकरी सापडल्याचे तिला सांगते.  आश्चर्याने चकित झालेल्या ऐश्वर्याने विचारले, "कसा, खूनी कोण आहे?"

 "तुमच्या चिठ्ठीची गोष्ट खरी ठरली.  मागणी केलेल्या पैशातून पैसे न मिळाल्याबद्दल नरेशच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने त्यांची हत्या केली आहे. "खोटे बोलून इंस्पेक्टर जाधव ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरील भाव वाचण्याचा प्रयत्न करत राहिले.  त्यांनी पाहिले, ऐश्वर्याच्या कपाळावर चिंतेच्या रेषा ओढल्या होत्या.  त्याने विचारले, "मारेकरी पकडल्याबद्दल तुला आनंद झाला नाही का?"

 "का नाही, मी खूप आनंदी आहे." ऐश्वर्या म्हणाली, "तुम्ही त्या कर्मचार्‍याला अटक केली आहे का?"

 "नाही, तो फरार आहे." इंस्पेक्टर जाधव म्हणाले.  अशा प्रकारे पुढील तपासासाठी त्यांना वेळ मिळणार होता.  यानंतर त्यांनी ऐश्वर्याच्या घराचे निरीक्षण करायला शिपायांना साध्या कपड्यांमध्ये ठेवले.  दुसर्‍याच दिवशी दुपारच्या सुमारास ऐश्वर्या तिच्या फ्लॅटमधून बाहेर पडली आणि मुख्य रस्त्यावरील स्टँडवर आली.  थोड्याच वेळात एक काळ्या रंगाची कार आली.त्यात ती बसली.  गाडीत कोण होता हे शिपायाला समजू शकले नाही.  पण त्याने त्या गाडीचा नंबर लक्षात ठेवला होता.  नंबरवरून दिसून आले की कार सलीमची आहे. 

 आता इन्स्पेक्टर जाधवांना गार्डकडून त्याची ओळख पटवावी लागली. जाधव आणि गार्ड वेश पालटून उभे राहिले जिथून  ऐश्वर्या कारमध्ये चढली होती.  ती गाडी थोड्या वेळात आली तेव्हा गार्डने सलीमला ओळखले.  दुसर्‍याच दिवशी इंस्पेक्टर जाधव ऐश्वर्याच्या फ्लॅटवर आले.  जेव्हा त्यांनी तिला सलीमबद्दल विचारले तेव्हा तिला धक्काच बसला.  ती काहीशी भडकली आणि म्हणाली, "सलीम माझा भाऊ आहे."

 "तो कोठे राहतो?"

 "चिंचवडला." ऐश्वर्या म्हणाली.

ऐश्वर्या सलीमला याची माहिती देन्याअगोदरच  इंस्पेक्टर जाधव आधीच तयार करून ठेवलेल्या आपल्या टीमसोबत त्याच्या घरी पोहचले.  चिंचवड मधील सांगितलेल्या पत्त्यावर पोहचल्यावर सलीमचा आलिशान बंगला  स्तब्धच झाले.  तिथल्या गार्डला सलीमबद्दल विचारले असता त्याने सांगितले की तो ऑफिसमध्ये आहे.  शोधून काढल्यानंतर इन्स्पेक्टर कार्यालयात पोहोचले आणि तेथे त्यांना सलूम सापडला. त्यांनी थेट विचारले, "रुखसाना उर्फ ​​ऐश्वर्याशी तुमाचे काय संबंध आहेत?"

 "रुखसाना येथे रिसेप्शनिस्ट होती.  माझ्याकडे दोन वर्ष काम केल्यावर त्याने नरेश नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. "

 "लग्नानंतर ती कुठे गेली?"

 "मला माहित नाही."

 "थोडा प्रयत्न करा, कदाचित आठवेल."

 "ती माझ्या दृष्टिकोनातून फक्त एक कर्मचारी आहे. बाकी तिच्याबद्दल मला काही माहिती नाही. इन्स्पेक्टर जाधव त्याला आणखी काय विचारणार  तेवढ्यात एक कर्मचारी आत आला आणि त्याने त्याच्याकडे एक चिठ्ठी दिली.  चिठ्ठी वाचल्यानंतर सलीम म्हणाला, "माफ करा सर, एक महत्वाचं काम आलं आहे, मी आता येतो."

 कर्मचाऱ्याला चहा देण्यास सांगून सलीम बाहेर गेला.  तिथे सीसीटीव्ही कॅमेर्‍याशी जोडलेल्या संगणकाची तपासणी इन्स्पेक्टरने केली.  ऐश्वर्या उर्फ ​​रुखसानाचा चेहरा स्क्रीनवर दिसत होता.  तिने बुर्का घातला होता,पण आत आल्यावर तिचा चेहरा उघडला होता.  इन्स्पेक्टर जाधव तिला पाहून आश्चर्यचकित झाले.  नरेशच्या हत्येमागे या दोघांचा हात असल्याची त्यांची  खात्री झाली.

 ऐश्वर्याने विचारले, "इन्स्पेक्टर आले नव्हते का?"

 "तो आत बसल₹ला आहे." सलीम म्हणाला, "त्याला इथला पत्ता कोणी दिला?"

 "मीच सांगितला आहे.  तू माझा भाऊ आहेस म्हणून मी त्याला सांगितले."

 "इडियट, तू सारा खेळ खराब केलास." सलीम कुजबुजत ओरडला.

 "मी खेळ कसा खराब केला?"

 "मी तुमचा भाऊ आहे असे म्हणायची काय गरज होती?"

 "आणखी काय सांगू मग?"

 "मी त्याला खरे सांगितले आहे की तू माझ्याकडे रिसेप्शनिस्ट होतीस."

 "आता काय होईल?" ऐश्वर्या अस्वस्थतेने बोलली.

 "आता जे काही होईल ते आम्ही दोघांन्नी मिळून निस्तरू."  तू आता जशी आली आहेस तशी निघून जा. ”सलीम म्हणाला आणि ऑफिसमध्ये आला.  तो  आपल्या खुर्चीत येऊन बसल्यावर इंस्पेक्टर जाधव म्हणाले, “तुम्ही रुखसानाला ओळखू शकता का?  यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल. ”

 "माझ्याकडे वेळ नाही."

 "वेळ काढावाच लागेल." इंस्पेक्टर जाधव जरा दरडावताच म्हणाले. इन्स्पेक्टर जाधाव जागेवरून उठले आणि चालू लागले. सलीमही उठला. सुरुवातीला सलीम रुखसानाबद्दल काहीच माहित नाही, असेच सांगत राहिला.  परंतु जेव्हा रुखसाना उर्फ ​​ऐश्वर्याशी तुझे अनैतिक संबंध असल्याचा पुरावा आमच्याकडे असल्याचे इन्स्पेक्टर जाधव यांनी सांगितले तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला.

 पोलिस स्टेशन गाठल्यानंतर इन्सपेक्टर जाधव यांनी ऐश्वर्या उर्फ ​​रुखसाना, सलीम आणि गार्ड यांना एकमेकांसमोर आणले.  आणि संपूर्ण गूढ उकलले.  गार्ड सलीमकडे पाहून म्हणाला, "साहेब हाच रोज रात्री ऐश्वर्या मॅडमला भेटायला यायचा."

 आता,  गुन्हा कबूल केल्याशिवाय, त्या दोघांकडे कोणताच पर्याय राहिला नाही.  सलीम आणि ऐश्वर्या पुरते अडकले होते.  आता इन्स्पेक्टर जाधवांना हे जाणून घ्यायचे होते की सलीमला घेऊन ऐश्वर्या उर्फ ​​रुखसानाने नरेशला का मारले?

 जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा रुखसाना रडत म्हणाली, सलीमकडे काम करत असताना माझे सलीमशी अनैतिक संबंध होते.  मला त्याच्याशी लग्न करायचे होते, परंतु त्याने नकार दिला.  मला पत्नी म्हणून नव्हे तर रखेल म्हणून ठेवण्याची त्याची इच्छा होती, जी मला मान्य नव्हती.  या बेवफाईने मी निराश झाले.  मग मला नरेश भेटला.  मी फार उशीर केला नाही.  नरेशनेही वेळ न दवडता माझ्याशी लग्न केले."

 "तुझ्यासाठी त्याने आपल्या रक्ताच्या माणसांशी संबंध तोडले  आणि तू मात्र त्याचा विश्वासघात केलास?"

 "तो सकाळी बाहेर पडायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा."  त्याच्यावर कामाचे ओझे इतके जास्त होते की घरी आल्यावर तो जेवून लगेच झोपायचा.  त्याने मला वेळ द्यावा अशी माझी इच्छा होती. माझ्याशी बोलावे, मला फिरायला न्यावे, असे मला वाटायचं,  पण त्याला त्याच्या कामांशिवाय दुसरे काहीच सुचत नव्हते. त्यामुळे माझी खूप चिडचिड व्हायची."

 "तो तुझ्या सुख सुविधेची काळजी घ्यायचा, हे काय कमी होते का?"

 "एखाद्या स्त्रीला केवळ सुख सुविधाच पाहिजे असे नाही. तिच्या आणखीही काही इच्छा असतात.   जर त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळ नसता  तर त्याने माझ्याशी लग्न केले नसते. ”ऐश्वर्या  म्हणाली.

 "याचा अर्थ दुसर्‍याशी संबंध ठेवावा असा होत नाही." इन्स्पेक्टर जाधव म्हणाले, "चला, तुम्ही संबंध ठेवले, ठीक आहे, पण नरेशला का मारले?"

 “नरेशच्या उदासिनतेमुळे मी पुन्हा सलीममध्ये गुंतायचा विचार केला.  योगायोगाने मी सलीमला त्या दरम्यान भेटले.  तो एका बझार मध्ये मला भेटला.  त्याने मला फोन नंबर मागितला नी मी तो दिला.  त्यानंतर संभाषण सुरू झाले, भेटीगाठी होऊ लागल्या.  सलीमने माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली.  तो नेहमी संध्याकाळी उशिरा माझ्या घरी यायचा आणि सकाळी लवकर निघून जायचा. "

 "तुझ्या नवऱ्याला काही हरकत नव्हती?"

 "मी रात्रीच्या कॉफीमध्ये त्याला मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या देत असे, त्यामुळे तो रात्रभर  झोपायचा.  तो एकदा रात्री उठला.  मला त्याच्याजवळ न येताच जेव्हा तो जागा झाला तेव्हा तो दुनाही हे पाहून दुसर्‍या खोलीतील लाईट पाहून तिथे आला.  सलीमला माझ्याबरोबर पाहून तो काहीतरी विचारणार, त्याआधी आम्ही दोघांनी त्याला घट्ट पकडले.  सलीमने त्याचा हात धरला तेव्हा मी त्याच्या तोंडात टॉवेलचा बोला कोंबला. यानंतर त्याला मृत्यू येईपर्यंत सलीम त्याचा गळा दाबत राहिला.  त्यानंतर, रात्री मृतदेह घेऊन विहीरीत टाकला. "

 चौकशीनंतर इन्स्पेक्टर जाधव यांनी ऐश्वर्या उर्फ ​​रुखसाना आणि सलीम यांना कोर्टात हजर केले, तेथून दोघांना तुरूंगात पाठविण्यात आले.  या दोघांचे काय होईल,  हे वेळच सांगेल, पण ऐश्वर्या उर्फ ​​रुखसानाच्या सौंदर्यावर फिदा होण्याची  नरेशला शिक्षा मिळाली. आजची नवीन पिढी मनावर नाही तर सौंदर्यावर जीव टाकते, ज्याचा त्यांना पुढे त्रासही होतो.

 (सत्य घटनेवर आधारित कथा.  पात्रांची नावे काही कारणास्तव बदलली गेली आहेत.)

No comments:

Post a Comment