गौतम पाटील संमेलनाध्यक्ष
सांगली,(प्रतिनिधी)-
येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षण विभाग (प्राथमिक माध्यमिक) जिल्हा परिषद सांगली व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय 6 वे विद्यार्थी साहित्य संमेलन मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2020 रोजी नव कृष्णा व्हॅली मराठी माध्यम, कुपवाड एमआयडीसी, सांगली येथे संपन्न होत असून या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून गौतम बाहुबली पाटील इयत्ता सातवी,समडोळी यांची निवड झाली आहे.
सांगली जिल्ह्याला विद्यार्थी साहित्य संमेलनाची परंपरा असून यापूर्वी मिरज, बेडग, कर्नाळ (सांगली ) येथे ही संमेलने सबकुछ विद्यार्थी अशी संपन्न झाली यातून 21 विद्यार्थ्यांचे काव्य, गोष्टसंग्रह प्रकाशित झाले आहेत. गौतम पाटील समडोळी यास बालकवी राज्य पुरस्कार प्राप्त झाला. अनेक साहित्यिकांशी संवाद साधता आला असून विद्यार्थ्यांच्या भाषिक गुणवत्ता वाढीस चालना मिळाली असून या सहाव्या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व किशोरचे संपादक किरण केंद्रे व डॉक्टर पृथ्वीराज तौर नांदेड, हनुमंत चांदगुडे ,पुणे ,संदीप नाझरे आमणापूर, मनोहर भोसले जयसिंगपूर हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत बाल साहित्यिकांचा सत्कार होणार आहे.
प्रसंगकथन सत्राचे अध्यक्ष विश्वजीत महादेव माने भाट शिरगाव शिराळा असून दहा विद्यार्थी कथा सादरीकरण करणार आहेत. अस्मिता विश्वास चव्हाण देशिंग यांच्या
अध्यक्षतेखाली कविसंमेलन होत असून यात 52 विद्यार्थी सहभागी होत आहेत. हे जिल्हास्तरीय संमेलन यशस्वी करण्यासाठी उपशिक्षणाधिकारी माध्यमिक नामदेव माळी . डायटचे डॉ. विकास सलगर, डॉ अंजली रसाळ , स्थानिक संयोजन प्रमुख शशिकांत नागरगोजे, साहित्यिक शिक्षक कृष्णात पाटोळे, दयासागर बन्ने, विजयकुमार पाटील, संतोष कदम , प्रकाश भुते ,मुशताक पटेल, तुकाराम गायकवाड, बाळू गायकवाड तसेच अधिकारी पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. गुणवत्ता विकासासाठी सदर साहित्य संमेलन सुनियोजित रित्या हावे यासाठी जिल्ह्याच्या विकास विभागाचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी जि प सांगली आदरणीय अभिजित राऊत यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली हे संमेलन होत असून शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती सुनंदा वाखारे व शिक्षणाधिकारी माध्यमिक सुधाकर तेलंग हे सहकार्य करत असल्याचे निमंत्रक तथा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर रमेश होसकोटी यांनी माहिती दिली.
अशा सूत्रसंचालक ते अध्यक्ष सबकुछ विद्यार्थी सहभागी असणाऱ्या सहाव्या विद्यार्थी संमेलनास दि.२५ फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता नव कृष्णा व्हॅली मराठी माध्यम एमआयडीसी कुपवाड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर रमेश होसकोटी , प्राचार्य डायट व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे भीमराव धुळूबुळू ,नामदेव भोसले यांनी सांगितले तर संमेलनाध्यक्ष गौतम पाटील व स्वागताध्यक्ष समृद्धी नागरगोजे यांनी संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment