जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील करजगी येथील मरमसाब मस्तान जतकर यांच्या राहत्या घराला अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाले. त्यात संसारउपयोगी साहित्यासह रोख रक्कम ,अर्धा तोळे सोन्याचे दागिने असे सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले.करजगी -मोरबगी रोडला जतकर यांचे घर वजा छप्पर आहे.शनिवारी सकाळी अचानक घरास आग लागली. बघता बघता आगीने उग्ररूप धारण केल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.
घटनास्थळी जेष्ठ नेते डॉ.बशीर बिराजदार, संरपच साहेबपाशा बिराजदार, उपसंरपच साबू बालगाव यांनी भेट दिली.तलाठी श्री.बामणे यांनी पंचनामा केला आहे. शासकिय मदत आठवड्याच्या आत देण्यासंदर्भात तहसिलदार कार्यालयात पाठपुरावा करू, असे आश्वासन तलाठी बामणे यांनी दिले. स्थानिक नागरिकांनी मदत गोळा करून जतकर कुटूंबियांना दिलासा दिला.
(करजगी ता.जत मरमसाब जतकर यांचे आगीत घराचे झालेले नुकसान)
No comments:
Post a Comment