Sunday, February 23, 2020

संत निरंकारीमार्फत ग्रामीण रुग्णालयांची साफसफाई


जत,(प्रतिनिधी)-
स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँम्बेसेडर असलेल्या संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशनच्यावतीने संत निरंकारी मंडळाचे तत्कालीन सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या ६६ व्या जयंतीनिमित्त संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन (दिल्ली) शाखा जत  सेवादल युनिट क्रमांक ११६१  यांनी ग्रामीण रुग्णालय जत येथे स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविले. देशभरामध्ये एकुण १३२० हाँस्पिटलची स्वच्छता करण्यात आली. जत रुग्णालयाच्या आतील भागाची व बाहेरील संपुर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर जत येथील एस. आर. व्ही. एम. हायस्कुल येथेही स्वच्छता करण्यात आली. यामध्ये सुमारे २०० निरंकारी भाविक भक्त सेवादल महापुरुषांनी सहभाग घेतला.

    दरम्यानच्या कालावधीत जत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ शुभांगी बन्नेनवर यांनी सदर अभियानास सदिच्छा भेट देऊन अभियानाचे कौतुक केले आणी सहभाग घेतला. सौ. बन्नेनवर म्हणाल्या की, निरंकारी सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज सत्संगच्या माध्यमातून मनाबरोबर बाहेरचीही स्वच्छता करण्याची महान सेवा करीत आहेत. हे कार्य सर्वांनी मनापासुन करण्याचा कायमस्वरूपी ध्यास घेतला तरच आपला देश स्वच्छ सुंदर होणार आहे. आज समाजाला संत निरंकारी मंडळाची गरज आहे, असे गौरवोद्गार काढले रुग्णालयाचे डाँ. अशोक मोहीते, एस. आर. व्ही. एम. हायस्कुलचे प्राचार्य श्री. कदम यांनी मंडळाच्या कार्याबद्दल कौतुक केले. प्रास्ताविक जत शाखेचे प्रमुख जोतिबा गोरे व आभार सेवादल संचालक संभाजी साळे यांनी मानले.
      दुपारच्या सत्रामध्ये संत निरंकारी मंडळाचे प्राचारक सागर माने (सांगली) यांचे उपस्थितीत सत्संग सोहळा संपन्न झाला. त्यावेळी बाबाजीच्या जीवनाविषयी आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले की, सदगुरु बाबाजीचा जन्म २3 फेब्रुवारी १९५४ साली झाला.  लहानपणापासूनच शांत प्रेमळ व सेवाभावी वृत्तीचे होते. त्यांचे वडील तत्कालीन सदगुरु बाबा गुरुबचन सिंहजी यांची हत्या झालेनंतर  त्यांना गुरुगादीवर बसविण्यात आले. त्यावेळी त्यांनी खुनाचा बदला खुनाने घ्यायचा असे काही भक्तगण म्हणत असताना सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराजांनी खुन का बदला जरुर लेंगे लेकीन रक्त नालीयोमे नहीं मानव के नाडियोमे बहाऐंगे असा प्रेमाचा व शांतीचा संदेश देऊन स्वत: रक्तदान करून रक्तदान  शिबीराची सुरुवात केली.  त्याचबरोबर स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, आपत्तीग्रस्थांना मदत इत्यादी सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यांच्या प्रेम, नम्रता शांती, विश्वबंधुत्व या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सामाजिक व आर्थिक परिषदेवर कार्यकारी सल्लागार म्हणून नेमणुक केली. दरम्यानच्या कालावधीत बाबाजीना शांतीदुत पुरस्काराने सन्मानित केले. अशा सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या शिकवणिची प्रेरणा घेऊन आपण आपले जिवन व्यतीत करण्याची गरज आहे ,असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी जाधव यांनी केले.  नियोजन सेवादल युनिट क्रमांक ११६१ चे सर्व सेवादल संत कार्यकर्त्यांनी केले.

No comments:

Post a Comment