Sunday, February 23, 2020

बोर्गी सरपंचांसह सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

जत,(प्रतिनिधी)-
जत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मुलभूत विकासाची कामे मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच वाड्यावस्त्यांसह जत नगर पालिका क्षेत्रातील दहा गावांच्या विविध विकास  कामाचे प्रस्ताव मी महाविकास आघाडी सरकारकडे सादर केलेअसून ती कामे अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करून घेऊ अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी बोर्गी (ता.जत) येथे बोलताना केले.बोर्गी (ता.जत)  येथील सत्ताधारी संरपचासह अनेक सदस्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

या प्रवेश सोहळ्यात बोर्गी बु.चे सरपंच सौ.गुरनिगव्वा श्रीशैल बिरादार, ग्रा.प.सदस्य गिरजबाई माळकरी कांबळे, दावल बादशाह पळूजकर, सुशिला शिवाप्पा कोळी,रिहान मताब सनदी, तमाराय हणमंत बिरादार, सौ.सुगला सिद्रया मलाबादी, शिवराज शेडबाळ, गगणगौडा पाटील, मलाप्पा बिराजदार, रमेश उमराणी, प्रवीण अंकलकोट यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.त्यांचे स्वागत आ.सांवत व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी केले. आ.सांवत म्हणाले,सध्या राज्यात कॉंग्रेस पक्ष सत्तेत आहे.मीही आमदार आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध योजनासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तालुक्याला मोठा निधी मिळणार आहे. जत पुर्व भागातील सर्वात मोठा प्रश्न असणारा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत, असेही आ.सावंत म्हणाले.

No comments:

Post a Comment