Monday, February 24, 2020

वर्षात 42 हजार लोकांना सर्पदंश


 महाराष्ट्रात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. २0१८-२0१९मध्ये महाराष्ट्रात ४२ हजार २६ जणांना सर्पदंश झाला असून त्याखालोखाल पश्‍चिम बंगालमध्ये ३६ हजार ८५८ घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात नाशिकमध्ये सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडल्या असल्याचेही एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

इहेएर र्जनल'मध्ये हा अहवाल छापून आला आहे. जगातील सर्पदंशांच्या घटनांपैकी अध्र्या घटना एकट्या भारतात घडत आहे. तसेच सर्पदंशाने दगावणार्‍यांची संख्याही भारतात सर्वाधिक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २0१७-२0१८च्या अहवालानुसार महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे ३२ लोकांना साप चावल्याचे उघड झाले आहे. तर पश्‍चिम बंगालमध्ये ३६, तामिळनाडूत ३६ आणि गोव्यात ३४ लोकांना साप चावल्याचे आढळून आले आहे. तर २0१८-२0१९मध्ये महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे ३५ आणि पश्‍चिम बंगालमध्ये ३९ लोकांना साप चावल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, सर्पदंशामुळे दगावण्याचे महाराष्ट्रातील प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यातील सर्पदंशाच्या घटनांमद्ये वाढ झाली असून पश्‍चिम बंगालच्या १२ जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटना घडल्याचे आढळून आले आहे. २0१८-१९मध्ये नाशिकमध्ये सर्पदंशाच्या ४२९४ घटना घडल्या आहेत. पालघरमध्ये ३२0४, ठाण्यात २६५५, कोल्हापूर २२९८, पुणे २१0२, र%ागिरी १९९४ आणि जळगावमध्ये सर्पदंशाच्या १८४२ घटना घडल्या आहेत.

No comments:

Post a Comment