प्रकाश जमदाडे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा) -
पुराचे पाणी दुष्काळी भागात देण्यविषयी जो निर्णय मंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे, तो निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया बाजार समितीचे माजी सभापती व रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील साहेब यांनी पूराचे पाणी दुष्काळ तालुक्यास देणेसाठी पाटबंधारे खात्याला प्रस्ताव तयार करणेच्या सुचना दिल्या आहेत. या निर्णयाचा आम्ही स्वागत करीत आहोत. सन २००५ सालापासून आम्ही याची मागणी करीत आहोत कारण, जत तालुक्यात एकही बारमाही नदी नाही पावसाचे प्रमाण आतिश्य कमी आहे.
त्यामुळे मार्चपासुन ऑगस्ट-सप्टेंबर पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरवरती शासनाचे कोटयावधी रूपये खर्च होतात. तो खर्च वाचणार आहे तसेच शेतकऱ्यांना पाहीजे ती पीके घेता येणार आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये ८९ गावे व ७५२ वाडयावस्तीवर ११३ टॅकर व्दारे पिण्यासाठी पाणी पुरवले जात होते. ते ही जत (बिरनाळ तलाव ) व अंकलगी (साठवण तलाव) येथेच टॅकर भरणेची सोय होती. जवळपास ५० किमी लांबून पिण्यासाठी टॅकरने पाणी आणावे लागत होते. पावसाळयात जत तालुक्यातील साठवण तलाव, सिमेंट बंधारे भरून दिलेस त्याचा अतिशय चांगला फायदा होणार आहे या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
ना. जयंत पाटील साहेब अर्थमंत्री असताना १९७१ पासून अपूर्ण असणारा गुड़्डापूर साठवण तलावास मंजूरी दिली तसेच कंठी, कोळगिरी, कोसारी,गुगवाड, उमराणी,अंकलगी, पांडोझरी (मोटेवाडी), दरीबडची
इत्यादी साठवण तलाव व कोल्हापुर पध्दतीचे पंधारे यांना मंजूरी देवून पुर्ण केली आहेत. तालुक्यात जवळपास २८ साठवण तलाव २ मध्यम प्रकल्प २४० सिमेंट बंधारे व छोटे मोठो पाझर तलाव आहेत म्हैशाळ योजनेच्या माध्यमातून उत्तरेस येळवी सनमडी तर दक्षिणेस बिळूरपर्यंत पाणी आले आहे पाईपलाईनचे कामे गतीने चालू आहेत.
आज ही संख व दोड्डनाला मध्यम प्रकल्प कोरडे ठणठणीत आहेत. सध्या ५ गांवाना टॅकर व्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. पुराचे पाण्याने साठवण तलाव व बंधारे भरून दिलेस शेतकऱ्यांना अतिश्य फायदा होणार आहे व जीवनमान उंचावणार आहे टैकर, चारा छावणी इत्यादी वरती शासनाचा होणारा खर्च वाचणार आहे व प्रशासनावरील ताण कमी होणार आहे त्यामुळे सांगली व सांगलीच्या पश्चीम भागामध्ये पुराचा धोकाही टळणार आहे. कोरोनाच्या महामारीला प्रतीबंध करणेसाठी सांगली जिल्हयाबरोबरचं महाराष्ट्र राज्यात ही परिस्थीती समर्थपणे हाताळत आहेत. या भयानक संकटातूनही पुराचे पाणी दुष्काळी तालुक्याला देणेचा निर्णय अतिशय चांगला आहे, असे जमदाडे यांनी म्हटले आहे.

No comments:
Post a Comment